विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

सेनापती धनाजी जाधवराव यांची नातू सरदार रामचंद्र जाधवराव यांची समाधी

 


सेनापती धनाजी जाधवराव यांची नातू सरदार रामचंद्र जाधवराव यांची समाधी शोधण्यात यश ⛳⛳
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज (दू) व छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात छत्रपती घराण्यातील पाच पिढ्यानपिढ्या मराठेशाही जरीपटका फडकवत ठेवणारे सरसेनापती धनाजी जाधवराव यांची नातू व सेनापती चंद्रसेन जाधवराव यांची पुत्र निजामशाहीतील सरदार रामचंद्रराव चंद्रसेन जाधवराव यांची समाधी शोधण्यात अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा. श्री. संतोष झिपरे यांनी यश आले आहे सदर समाधी फोटो व सरदार रामचंद्रराव जाधवराव यांची बद्दल संक्षिप्त इतिहास :-
👏🏾👏🏾राजश्री नानासाहेब पेशवे यांनी दि. ६-१०-१७५२रोजी एका पत्र सुभेदार मल्हारराव होळकर व राजश्री जयाजीराव शिंदे गोसावी यासी पत्र पाठवून दिले त्यात सरसेनापती धनाजी जाधवराव पुत्र चंद्रसेन जाधवराव वडीलपुत्र राजश्री सरदार रामचंद्र जाधवराव यांच्या सोबत असलेल्या सरदार व मनसबदार यांची यादी पत्रात दिले आहे तो असे 👏🏾👏🏾
(श१६७४भाद्रपद व १४
ता. ६-१०-१७५२)
!!श्री!!
!!राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जयाजी शिंदे गोसावी याचा!!
उपरि राजश्री रामचंद्र जाधवराव यासमागमें सरदार मनसबदार आहेत त्यास नबाबाचे इजायेतनामे यावे म्हणोन लिहिले आहेत सरदार:-
१मालोजीराजे घोरपडे मुधोळकर
१भालेराव पांढरे व गुरुबक्ष पांढरे
१मनय्या नाईक किलीच नाईक जमीदार देवदुर्ग
१रायाजी भोसले
१आनंदराव जमीदार पो कमरनगर ऊर्फ कर्नील
१गिरजोजी हाके
१शकरमा जमीदार पो अदोल
१भूपाळराव निंबाळकर
१कृष्णाराव नाईक निंबाळकर
१मकरदसिंग नाईक निंबाळकर
१आगाज सलगर
१पामनाईक बहिरी जमीदार पो वागनगिरा वगैरे
१लक्षमकाजे व जेमकरंडी जमीदार पो कानमुर्ति
१रामराव जमीदार गदवाल १अगाजा सलगर
१महापतराव निंबाळकर
१येशवतराव निबांळकर
येणेप्रमाणे सरदारास इजायतनामें पाठविणे की राजे रामचंद्र जाधवराव यांस इजायेतनामा पाठविला आहे तरि तुम्ही ऋत्याजपाशा येऊन त्याचे हमराहा मुलाजमत करणे म्हणोन इजायेतनामे नबाबाचे पाठवणे छ २७जिलकाद बहुत काय लिहिणे
लेखनसीमा
---------------------------------------
लेख व माहिती संकलन
संतोष झिपरे ९०४९७६०८८८
----------------------------------------
निजाम -उल मुलक यांला दक्षिणचा सुभातून. मधून सरसेनापती धनाजी जाधवराव पुत्र चंद्रसेन जाधवराव व पुत्र रामचंद्र जाधवराव यासिं ६०लक्ष उत्पन्नाचा मुलुक मिळाला त्याची यादी खाली दिल्या आहे
१परगणे भालकी राहण्याची जागा
१परगणे निलगे
१परगणे प्रतापपूर
१परगणे सटवली
१परगणे आळंद
१परगणे चितापुर
१परगणे गदवल
१परगणे गुजोटी
१परगणे चरचनापल्री
परगणे कल्याण किल्ला राहण्याची जागा
१परगणे हुमणबाद
१परगणे कलबर्गे
१परगणे येकहोली
१परगणे वहादर वडा
१परगणे अबजलपूर
१परगणे अबजलपूर
१परगणे गुलमटनाल
१परगणे येगली
१परगणे चिटगोपे
वरील सर्व परगणे हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील मिळवून एकूण आजच्या १०जिल्ह्यातील जहागिरी या पिता व पुत्रास होते
-----------------------------------
लेख व माहिती संकलन
संतोष झिपरे९०४९७६०८८८
-----------------------------------
(ता ८-१०-१७५१/
श १६७३आश्विन व३०)
!!श्री!!
राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जयाजी शिंदे गोसावी यासिं
छ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो बाळाजा बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशळ जाणोन स्वकीय लिहीत जाणे़ं विशेष
३रामचंद्र जाधवराव यास नवाबाचे इजायतनामे सादर जहाले होते त्याचे जाब आले थैल्या
१जानोजीराव निंबाळकर थैली
१खान आलम थैली
-------
येकूण चार थैल्या पाठविल्या आहेत प्रविष्ट करुन उत्तरे पाठवायाची असली तर पाठवणे जणिज छ१८जिलकाद बहुत काय लिहिणे
------------------------------------
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिपरे९०४९७६०८८८
सरदार रामचंद्र जाधवराव यांनी भांतुब्रा हे किल्ला बांधले राजश्री
चंद्रसेन जाधवराव १७५१ सालीं मरण पावला.चंद्रसेनाचा वडीलपुत्र रामचंद्र जाधव यास निजामकडुन वडिलांची जहागिरी मिळाले यावेळेस रामचंद्र जाधवराव यांनी मराठा मुलुखात स्वारी करून प्रंचड धुमाकूळ घातला विशेषत सोलापूर पंढरपुर, मंगळवेढा, कासेगाव परंगणे उपद्रव मुल्य दिले . प्रसिद्ध उदगीर लढाईंत हा निजामाकडेच होता. स. १७६१ मध्यें निजामअल्लीनें गोदावरीतीरीं असलेल्या कायगांव टोकें नांवाच्या गांवातील हिंदु देवळें उध्वस्त केल्यावरून, रामचंद्र जाधव निजामशाही सोडून मराठयांच्या पक्षास मिळाला.
इ. स. १७६२ पानिपत नंतर राघोबादादानें याला मराठ्यांकडे बोलावले. परंतु सुभा गुजराथप्रांतहि आपल्या ताब्यांत देण्यांत येईल अशी जी यास आशा होती, ती सफळ न झाल्यानें हा लवकरच पुढें पुन्हां निजामकडे गेला. रामचंद्र हा स. १७६९ त हैदराबादला निजामच्या दरबारात स्वत निजामानां हत्या केला . त्याचा पुत्र खाशेराव ह्यास भालकीची जहागीर मिळाली होती. तो निजाम व टिप्पूबरोबरच्या एका लढाईंत म्हैसूर परिसरात ठार झाल्यावर (१७९१) त्याची भालकी जहागीर निजामशाही कडून खालसा करण्यात आले कारण पुढे वंशातील कोण वारसदार नाहीत
-----------------------------------
फोटो :- सरसेनापती धनाजी जाधवराव यांची नातू व सेनापती चंद्रसेनराव जाधवराव यांची पुत्र निजामशाही सरदार रामचंद्रराव जाधवराव यांची समाधी
-----------------------------------
मार्गदर्शन
मा. श्री. रणजीत दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष)
लेख व माहिती संकलन
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष. मा. श्री. संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...