विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

देशमुखांची श्रद्धा आणि दानत

 

*## अस्सल पुरावा ##**
🚩🚩🚩

देशमुखांची श्रद्धा आणि दानत 🚩🚩🚩
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ परगण्याचे आमचे पूर्वज श्रीमंत बावाजीराव सुर्याजीराव शिंदे देशमुख शिक्केकरी यांचे अस्सल दानपत्र ( मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १५ (शिवकालीन घराणी) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे समग्र साहित्य )
*## श्रीमंत खूप जण असतात परंतु दानत फार कमी जणांच्यात असते *##
आमचे पूर्वज श्रीमंत बावजीराव सुर्याजीराव शिंदे देशमुख शिक्केकरी यांनी शके १६२० भाद्रपद कृष्ण पक्ष दशमी वार गुरुवार म्हणजेच इसवी सन १६९८ रोजी आपली गुरुवर्य श्री सकलगुणपरिपूर्ण ईश्वरी अधिष्ठान श्री भुवानगिरी गोसावी यांना मुक्काम मौजे निंब प्रांत वाई ( म्हणजे आजचे लिंब तालुका सातारा जिल्हा सातारा) यांना गुरुदक्षिणा म्हणून मौजे आखाडे येथील साहाटकाचे चावर पैकी १० बिघे म्हणजे सर्वसाधारण १३ एकर पाणस्थल जमीन दिली आणि त्यास कोणीही हरकत घेणार नाही असा आपल्या गुरूंना विश्वास दिला.
*## याला म्हणतात दानत*##
आजकालच्या जगात एक फुटवरून एकमेकांची डोकी फोडणारी माणस आहेत.
धन्य आहेत आमचे पूर्वज आणि आम्ही भाग्यवान आहोत की आमचा जन्म या वैभवशाली दानशूर आणि पराक्रमी घराण्यात झाला.
आमच्या पूर्वजांना त्रिवार नमन !!! 🚩🚩🚩🙏🙏🙏
संदर्भ - ( मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १५ (शिवकालीन घराणी) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे समग्र साहित्य )
# संकलन आणि लेखन #
श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी
कुडाळ परगणे जावळी प्रांत सातारा जिल्हा
संपर्क क्रमांक
9766379781

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...