विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

इंग्रजाविरूद्ध हिंदुस्थानातील सत्तांचा राज्यसंघ स्थापन केला पाहिजे---- श्रीमंत महादजी शिंदे सरकार.

 


इंग्रजाविरूद्ध हिंदुस्थानातील सत्तांचा राज्यसंघ स्थापन केला पाहिजे---- श्रीमंत महादजी शिंदे सरकार.
पोस्तसांभार :प्रसाद शिंदे 
इंग्रज हाच आपला अंतिम शत्रू आहे. हे महादजीनी ओळखले होते. त्याद्रष्टीने त्यानी तयारी केली होती. आजच्या लेखाचा विषय तोच आहे. याबाबतीत अनेक इतिहास तज्ज्ञाबरोबर मान्यवरांनी लिखाण केले आहे. सरदेसाई, स श देसाई, राजमाता विजयाराजे, फडके, अनेक इंग्रज इतिहासकार अशा काहींचा उल्लेख करतो आहोत. अर्थात त्यांची मतं येथे देत नाही. फक्त या आधारे महादजीनी आखलेल्या एका योजनेबद्दल विवेचन करीत आहोत.
महादजींचे सामर्थ्य जसे इंग्रजाना ठाऊक होते तशी इंग्रजांची शक्ती महादजी ओळखून होते. सातासमुद्रापार आलेले हे फिरंगी धाडसी आहेत आणि लूटमारीची नि हिंदुस्थान जिंकून घेण्याची त्यांची लालसा कधीच शमणारी नाही याचा महादजीना अंदाज आला होता. म्हणून तर बादशहाला आक्रमक हेस्टिंग्ज ने आपल्या पंखाखाली घेण्याअगोदर च महादजीनी तातडी केली. इंग्रजांचा कावा व साम्राज्यवादाची पावले जितकी महादजीनी ओळखली होती तितके ब्रिटीशाबद्दल नानां फडणवीसांनाही ज्ञान नव्हते.
इंग्रजांची हिंदुस्थानातून हकालपट्टी करीपर्यंत तरी महादजीना बादशाहीचे उच्चाटन करता येत नव्हते. इंग्रजाविरूद्ध हिंदुस्थानातील सर्व सत्तांचा एक राज्यसंघ ( confederation) निर्माण करून इंग्रजाना या देशातून घालवून देण्याची महादजींची एक योजना होती. कर्नल मालेसन याचे असे मत इंग्रजीत आहे पण ते येथे देत नाही.
लष्करी तयारी केली होती. तोफा, बंदूका आणि दारूगोळे तयार करण्याचे काम जोराने चालू होते. मग राजकीय डावपेच म्हणून या प्रकारे सर्व सत्ताना एकत्र आणून संघटितपणे इंग्रजाना अखेरचा लढा देण्याची त्यांची योजना असणे सहज शक्य आहे. म्हणून तर टिपू सुलतान विरूद्ध पुणे दरबारने इंग्रजाना मदत करू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण त्याना त्यात यश आले नाही. या अंतिम आणि उच्च ध्येयासाठी च बहुधा सर्व सत्ताशी त्यांनी सलोखा ठेवला असावा. अर्थात त्याना ही अंतिम योजना राबवायला नियतीने संधी व आयुष्य दिले नाही हे देशाचे दुर्दैव.
✒ डॉ.पी.एन.शिंदे सर
9850063410

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...