भाग ३
सांभार :https://www.lokrajya.com
कुलाबा
येथे शिवकालीन आंग्रे कुलोत्पन्न तुकोजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली
जहाजबांधणी कारखाना कार्यरत होता. ‘कुलाबा’ या शब्दाचा अर्थच गोदी होय. या
गोदीत शिरब, पाल, गलबत ही अर्वाचीन काळातील जहाजे बांधली जात. भारतीय
जहाजबांधणी उद्योगाची ती पहिली पायरी होती.
रत्नदुर्गच्या
(रत्नागिरी) दक्षिण अंगाला उत्खननात एक भुयार सापडले. निरीक्षण केले असता
समजले की, तो एक तरता तराफा होता. त्याद्वारे जहाजांना युद्ध सुरु असताना
सुद्धा किरकोळ डागडुजी करुन जायबंदी जहाज पुन्हा मोहिमेवर रवाना केले जात
असे. यालाच Floating Docs For Base Repairing Units असे आधुनिक काळात
संबोधतात. अशा या दुर्गम जलदुर्गावर दोन-तीन टनांच्या प्रचंड तोफा
मावळ्यांनी कशा चढविल्या, हे एक कोडेच आहे. याचाच अर्थ शिवरायांचे दळणवळण
खाते तंत्रयुद्ध व अद्ययावत होते हे दिसुन येते.
स्वयंभु
भौगोलिक महत्त्वामुळे शिवरायांनी दख्खनचे जिब्राल्टर म्हणुन
मान्यताप्राप्त असलेल्या रायगडाची राजधानी म्हणुन निवड केली. या गडावरुन
देश व कोकण या दोन्ही प्रांतांवर करडी नजर ठेवता येते. या राजधानीची मांडणी
करताना प्रथम शिवरायांनी बाजाराची जागा मुक्रर करुन गडावर ऐन वख्ताला
दाणापाणी कमी पडु नये याची खात्री व सोय करुन ठेवली.
या
बाजारात सैन्याला रास्त दराने वस्तु मिळुन शिबंदीत कमतरता न भासता
व्यापारात वृद्धी होऊन स्पर्धात्मक तत्त्वावर उत्तमोत्तम चीजवस्तु
प्रजाजनांना मिळतील अशी व्यवस्था व योजना होती. बारा बलुतेदारांना
स्वराज्याच्या सेवेत आणुन भुमिपुत्रांना उद्योगधंद्यात उत्तेजन दिले.
शस्त्रास्त्र निर्मिती सुरु केली.
महाराजांनी
किल्लेदार व गडकरी यांना काही सुरक्षा सुचना आपल्या आज्ञापत्रातून दिल्या
आहेत. ‘गडकरीहो, सावध चित्ताने वर्तणुक ठेवुन दुर्गाची निगा राखणे,
अंधाऱ्या रात्री गडाचे आगळ, कडीकोयंडे कोठारात वातीच्या दिव्याचा वापर न
करणे, अन्यथा उंदीर तेलाच्या लोभाने वात पळवताना कोठारास आग लागुन
स्वराज्याच्या संपत्तीचे नुकसान होईल. याबाबत कसुरात टाळाटाळ खपवून घेतली
जाणार नाही. झाल्यास मुलाहिजा न ठेवता देहदंड.’
अर्वाचीन
काळात औद्योगिक सुरक्षितता यावर जो भर दिला जातो त्याची जाणीव तीनशे
वर्षांपुर्वी शिवरायांना होती व स्वराज्यात त्याबाबत जागृती व्हावी या
विचाराने शिवाजी महाराज पावले टाकत. सांप्रत काळी शिलेदार व कास्तकार हे
दोघेही दुर्लक्षित आहेत. सैन्यकपात व शेतकीला आलेले गौणत्व हे काही भुषणावह
नाही. सैन्याचे अर्थकारण उणे करुन सरकार सैन्यावर अन्याय करीत आहे. आज
भारताला सीमासुरक्षा व दहशतवाद या संकटांविरोधात लढा द्यायचा आहे याची
जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
लेखन साभार – विनायक अभ्यंकर (माजी नौसेना अधिकारी)
वाचा – शिवरायांची सुरत लुट की छापा ?
© लोकराज्य टीम.
No comments:
Post a Comment