इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ
पेशव्यांकडून इचलकरंजीकरांना मिळत असे 11 हजार 410 रुपये तैनात
इचलकरंजीच्या
इतिहासात ज्या महिलांनी गौरवशाली कामगिरी केली त्या मध्ये अनुबाई यांचा
उल्लेख करावा लागेल. व्यंकटराव यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र नारायण
तात्या यांच्याकडे कारभार आला पण या कालावधित अनुबाई यांचे पराक्रम
उल्लेखनीय ठरले.पेशव्यांच्या अनेक स्वाऱ्यांमध्ये नारायणतात्या आणि
अनुबाईंचा यांचा सहभाग होता. पेशव्यांकडून इचलकरंजी करांना 11 हजार 410
रुपये तैनात मिळे. त्याची विभागणी घर बेगमी 5 हजार, अनु बाईंना पालखीत
अकराशे, नारायण तात्या व लक्ष्मीबाईंना प्रत्येकी एक हजार रुपये अशी
करण्यात आली . अकरा खंडी गहू(440 रुपये), पंधरा खंडी तांदूळ(900 रुपये ),
एक खंडी मीठ(25रुपये ) एक खंडी तुरी(30 रुपये ) बारा खंडित
जोंधळे(360रुपये ) पालखी सामानाबद्दल अनुबाईंना 150 रुपये, तात्या व
लक्ष्मीबाई प्रत्येकी 65 रुपये, कापडासाठी अनुभवांना 350 व तात्यांना 750
रुपये आणि कारकूनास कापड व 175 रुपये असा तपशील होता.
ज्या वयात व्यंकटराव यांचे निधन झाले त्यावेळी संस्थांनापूढे अनेक प्रश्न होते. संस्थानाचा कारभार सांभाळण्याची क्षमता त्यांचा मुलगा नारायणतात्या यांच्याकडे नव्हतीच. नारायणतात्या यांच्या आई अनुबाई यांना तात्या हा लाडात वाढलेला आणि त्याला कोणतेही काम स्वतंत्रपणे करता येत नाही असे म्हणत असत. नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधू यांचा मोठा दबदबा होता. नानासाहेब हे अनुबाई यांचे भाचे असल्याने त्यांची इचलकरंजी संस्थानाला मोठी मदत झाली.त्यामुळे व्यंकटराव यांच्या पत्नी अनुबाई यांनी सूत्रे हाती घेतली. व्यंकटराव यांच्याकडे जी सरदारी होती तीच नारायण तात्या यांच्याकडे सोपविली. अनुबाईंनी इचलकरंजी संस्थानाचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक सदना कडून घेतल्या व गावेही इनाम घेतली. आजरे महालाचा एकतर्फी 31 खेड्यांची सनद शंभू छत्रपतींनी अनुबाई यांच्या नावे केली होती. पेशव्यांनी कर्नाटक व स्वारी केली त्यामध्ये नारायण तात्या प्रमुख सरदार होते. 1753 ते 1756 पर्यंत झालेल्या कर्नाटकातील स्वार्यांलत नारायण का त्यांनी महसूल गोळा करण्यामध्ये मोठी मदत केली होती. कर्नाटकातील श्रीरंगपट्टण पर्यंत पेशव्यांचे लश्कर केले होते. कित्तूर, सोदेसावनूर, रायदुर्ग, चित्रदुर्ग, बिदनूर आदी नऊ संस्थांकडून सदतीस लाखांची खंडणी त्यांनी गोळा केली होती. संस्थानाशी खंडणीच्या ठराव हा नारायणतात्या यांच्या मध्यस्थीने होत असे. कर्नाटकातील नवीन मिळालेल्या मुलखातील धारवाडच्या विविध कारणाने इचलकरंजीकरांवर करवीर दरबाराच्या विशेष राग होता. इचलकरंजीकरांना पेशवे, पटवर्धन यांचे विशेष पाठबळ आणि फौजफाटा असल्याने इचलकरंजीकर ही कोल्हापूरकरांना फारसे घाबरत नसत. तरीही एकमेकावर कुरघोड्या सुरूच होत्या. 1767 च्या सुमारास करवीरकरांनी इचलकरंजी व नांदणी येथील गुरे पळवून नेली आणि कडब्याच्या गंजीला आग लावली. त्यावेळी इचलकरंजीत गोविंद महादेव व शीदोजी जगताप अंमलदार होते. त्यांनी करविकरांशी युद्ध केले आणि करवीर तालुक्यात लुटालूट केली. तात्या व अनुबाई मोगलाईच्या विरोधात लढाईत होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी समेट घडवून लुटलेली एकमेकांची गुरे परत दिली.

No comments:
Post a Comment