इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ
रुई आणि लाट गावात झाली घमाशान लढाई.. आणि झाले असे
इचलकरंजी
आणि करवीर संस्थानात १७४० च्या सुमारास वाद विकोपाला गेला. यातून
इचलकरंजी संस्थान हद्दीत वारंवार हल्ले होत होत राहिले. आणि या संघर्षातून
रुई,अब्दुललाट या ठिकाणी लढाया झाल्या. करवीराचा कारभार जिजाबाईं
यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी इचलकरंजी संस्थांकडून केलेली मागणी हेच
संघर्षाचे कारण ठरले.
इचलकरंजी
संस्थांनाला सातारकर शाहू महाराज यांची मोठी साथ होती. करवीरच्या ताराबाई
व संभाजी महराज यांनी अष्टप्रधानाची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांची
फार मोठी महत्वाकांक्षा होती. संभाजी महाराजांच्या कालावधीत १७४० ला
त्यांच्या थोरल्या पत्नी जिजाबाई त्यांच्या तंत्राने राज्य कारभार सुरू
होता. या कालावधीत जिजाबाई यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त होते.
त्यामुळे प्रतिनिधी, अमात्य, सेनापती, इतर अधिकारी, इनामदार आदीशी
जिजाबाईंचे पटत नव्हते. जिजाबाईंचा कारभार सुरू झाल्यानंतर करवीर दरबाराने
इचलकरंजीकरांचे व्यंकटरावांकडें इनाम तिजाई मागितली. ती त्यांनी देण्याचे
साफ नाकारले. त्यामुळे करवीरहुन मार्च १७४२ मध्ये अजोजी जाधव या नावाचा
सरदार फौजेसह इचलकरंजी कडे आला. त्याने इचलकरंजी संस्थानाचा इनामातील लाट
गावावर स्वारी करून तेथील गुरे पळवून नेली. इचलकरंजी नरसीपंथ म्हणून
व्यंकटरावांचा दिवाण होता. त्याने हे वृत्त ऐकताच मौजे रुई( सध्याचे रुई
ता. हातकणंगले) येथे हल्ला करून गाव जाळले व तेथील गुरे, संपत्ती लुटून
आणली. याप्रसंगी झालेल्या लढाईत ४० जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले.
नंतर त्याच वर्षी अजोजी जाधव यांनी मोठी फौज व तोफा बरोबर घेऊन इचलकरंजी
वर जोरदार हल्ला चढविला. परंतु व्यंकटराव यांच्या सरदारांनी त्याचा पराभव
करून त्यांना पळवून लावले. पुन्हा तीन वर्षांनी त्याच अजोजी यांनी पुन्हा
एकदा इचलकरंजीवर हल्ला चढवीला. तेव्हाही व्यंकटराव यांच्या सरदारांनी
त्यांच्याशी दोन हात करून विजय मिळवला.
इचलकरंजीचे
सैन्य भारीच ठरत होते. या लढाईत अजोजी यांचे ५० हून अधिक जण ठार झाले,
तर अनेक जण जखमी झाले. पराभव दिसू लागतात अजोजी यांच्या फौजेने तेथून पळ
काढला. या विजयामुळे व्यंकटरावांचा परिसरात दबदबा वाढला तर राजदरबारी
त्यांचे वजन आणखी वाढले. सातारच्या शाहू महाराजांच्या आज्ञेवरून व्यंकटराव
गोव्याच्या स्वारी वर दोन वेळा गेले होते. तेथे त्यांनी मोठा पराक्रमही
गाजवला होता. गोव्याच्या स्वारी हून परत आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली
तरीही नानासाहेब पेशव्यांच्या फौजेबरोबर ते होते. १७४३ पासून त्यांना
क्षयरोगाने ग्रासले. त्यामुळे एका जागी राहून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्य
वाटेना. म्हणून ते इचलकरंजी, नांदणी, टाकळी, उत्तुर या ठिकाणी राहत
असत. त्याकाळी देवाधर्मावर व भुताखेतांवर लोकांचा फार विश्वास होता. सदरगे
( सध्याचे सदलगा ता.चिकोडी) येथे प्रसिद्ध देवऋषी होता. या देवऋषी कडे
विविध भागातील लोक उपचार घेऊन बरे होऊन जात अशी ख्याती होती. त्यामुळे
व्यंकटराव नारायण कुटुंबासह १७७५ मध्ये सदलगा येथे जाऊन राहिले. तेथे
त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
लहानपणापासून केलेली दगदग, पळापळ यांनी त्यांचे शरीर थकले. तेथेच त्यांना
मृत्यूने गाठले. (क्रमशा..)
No comments:
Post a Comment