इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ
पेशव्यांकडून इचलकरंजीकरांना मिळत असे 11 हजार 410 रुपये तैनात
नारायणतात्या
यांच्या मनात खदखद कायम होती. संस्थानाचा कारभार त्यांना करता येताच
नव्हता. सर्व कारभार अनुबाई पहात असल्याने नारायण तात्यांचे फारसे चालत
नसे. अनुबाई आजारी असताना नारायण तात्यांनी आपली हुकूमत तयार करण्यासाठी
मोठा खटाटोप केला. आजारातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी नारायणतात्या यांची
समजूत काढली. नारायणतात्या व नातू व्यंकटराव दादा यांना त्या पुण्यात घेऊन
गेल्या.नारायण तात्यांना मुलगा व दोन मुली होत्या. मुलाचे नाव व्यंकटराव
दादा तर मुलींची नावे बचाबाई, सगुणाबाई अशी होती. वयाच्या पाचव्या वर्षी
1758 मध्ये मुंज व 1759 मध्ये व्यंकटराव दादांचे लग्न पुण्याच्या भिडे
सावकाराची मुलगी रमाबाई यांच्याशी झाले. अनुबाईंची भीड पेशव्यांच्या
दरबारी चालत असल्याने त्यांनी नातू व्यंकटरावदादांच्या नावे सरदारी करून
घेतली व पुन्हा सैन्य पथकाची उभारणी केली. पेशव्यांकडून इचलकरंजी करांना
11 हजार 410 रुपये तैनात मिळे. त्याची विभागणी घर बेगमी साठी 5 हजार, अनु
बाईंना पालखीत अकराशे, नारायण तात्या व लक्ष्मीबाईंना प्रत्येकी एक हजार
रुपये अशी करण्यात आली . अकरा खंडी गहू(440 रुपये), पंधरा खंडी
तांदूळ(900 रुपये ), एक खंडी मीठ(25रुपये ) एक खंडी तुरी(30 रुपये ) बारा
खंडित जोंधळे(360रुपये ) पालखी सामानाबद्दल अनुबाईंना 150 रुपये, तात्या व
लक्ष्मीबाई प्रत्येकी 65 रुपये, कापडासाठी अनुभवांना 350 व तात्यांना 750
रुपये आणि कारकूनास कापड व 175 रुपये असा तपशील होता. पुण्याजवळील
पार्वती व हडपसर येथील जमीन इचलकरंजी कडे देण्यात आली. इचलकरंजीकर यांची
गावे, खेडी, शेती, कुरणे, बाग वगैरे आहेत. त्यास ऊपसर्ग न देण्याची
पेशव्यांनी 1767 मध्ये कोल्हापूरच्या जिजाबाईंना पत्रे लिहिली.
त्याप्रमाणे बंदोबस्त झाल्यानंतर अनुबाई, तात्या व दादा इचलकरंजीत परत
आले.नारायणतात्या हे आजारी होते. त्यांचे दुखणे वाढत गेले आणि 17
नोव्हेंबर (1770) च्या सुमारास नारायण तात्या यांचे निधन झाले. अनुबाई
यांचाही वृद्धापकाळ आला होता. नानासाहेब पेशव्यांच्या स्वारीत फौजेची तयारी
करणे व पैशाची आखणी करणे हे काम त्या करत होत्या. (क्रमशा:)
No comments:
Post a Comment