इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ
इचलकरंजी संस्थानचे नारोपंत यांचे निधन आणि व्यंकटरावांचा उदयकाळ……..
प्रचंड
धावपळ प्रचंड धावपळ, जबाबदाऱ्या यामुळे नारोपंत यांची प्रकृती ढासळली आणि
1720 दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नारोपंत यांच्या मृत्यूच्या वेळी
कुटुंबातील माणसे बहिरेवाडी तर्फ आजचे येथे राहावयास होते. त्यांच्या
मृत्यूची बातमी समजताच संताजी यांचे चिरंजीव पिराजीराव घोरपडे हे सेनापती
व्यंकटराव यांना भेटण्यास आले. यावेळी ते म्हणाले, ” आमच्या वडिलांनी
नारोपंत यांना मुलाचा मान म्हणून त्यांचे कल्याण केले. ते स्मरून नारो पण
त्यांनी आमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही लहान असूनही आम्हाला शहाणे
केले. मोठे झाल्यानंतर आमची दौलत आमच्या हवाली केली. त्यांच्या पुत्राची
निर्वाहाची सोय करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. आमचे देशमुखी वतन मिरज
प्रांत आहे, ते आम्ही नारोपंत यांना वहीवाटीस दिले आहे. तेच वतन आम्ही
तुमच्याकडे ठेवतो. वतनाचे उत्पन्न खाऊन तुम्ही खुशाल निर्वाह करावा.”
अशाप्रकारे 1721 मध्यप्रांत मिरज येथील देशमुखी सदन व्यंकटराव यांच्या नावे
करून दिली.
नारोपंत
यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी व्यंकटरावाना सचिव पदही दिले नाही व
सेनापतींनीही त्यांच्या हाती कारभार ठेवला नाही. करवीरच्या दरबारातील
ताराबाईंचे मुख्य कारभारी रामचंद्रपंत व वडिलांच्या मृत्यूमुळे करवीरच्या
दरबारातील दौलत व्यंकटरावांना मिळणे मुश्कील होते आणि झालेही तसेच.
त्याचप्रमाणे करवीरचे पिराजीराव सेनापती व व्यंकटराव यांचेही संबंध फारसे
चांगले नव्हते. त्यामुळे व्यंकटरावांनी सातारा गादीचे राजे शाहू
महाराजांचा आश्रय संपादित केला. पेशवे यांच्यामुळे तेथे त्यांची प्रतिमा ही
चांगली होती. व्यंकटराव यांच्या अडचणी लक्षात घेऊन पेशव्यांनी
व्यंकटरावांसाठी सोय लावण्यासाठी प्रयत्न केला. त्यांचे फलित म्हणून शाहू
महाराजांनी व्यंकटरावांना सण 1722 मध्ये शिरढोन गाव इनाम दिले. 1723 मध्ये
नांदणी, मनेराजुरी, म्हापण व आरग ही चार गावे इनाम दिल्याची स्वतंत्र
सनदही दिले, तर सन 1724 मध्ये त्यांना उत्तूर गावही इनाम देण्यात आले.शाहू
महाराज यांनी व्यंकटराव यांना अशा पद्धतीने मदत केली.
( क्रमशा:)
( क्रमशा:)
No comments:
Post a Comment