इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ
आणि या कारणाने इचलकरंजी संस्थानावर आली होती जप्तीची वेळ
अनुबाईना
वृद्धापकाळामुळे दगदग सहन होत नव्हती.कोल्हापूरकराबरोबर समझोता करून
त्या इचलकरंजी संस्थांबरोबर लढाया टाळण्याचे प्रयत्न करीत होते. या
वयातही त्या नातू व्यंकटराव यांच्यासाठी कारभार पाहत होत्या. परंतु
कोल्हापूरकरांनी पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्या मुलाखात लुटालुटी करावी
असा आदेश दिला. यामुळे कोल्हापूरकरांचा त्रास इचलकरंजी करांना सुरू झाला.
1774 मध्ये येसाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फौज व तोफा घेऊन
इचलकरंजीवर चालून आले. ही लढाई टाळण्यासाठी अनुबाई यांनी प्रयत्न केले,
मात्र त्याला यश आले नाही. इचलकरंजीकरांकडे महादजी विठ्ठल फडणीस हे शूर
सेनापती होते. त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एकमेकाची गावे लुटणे,
खंडण्या घेणे, ठायी काबीज करणे असे प्रकार सुरू झाले. त्यामध्ये करवीरकर
पराजित झाले. त्यानंतर अनेक लढाया सुरूच राहिल्या. महादजी विठ्ठल यांनी या
लढाईत आळते व चिप्री ही ठिकाणे इचलकरंजी यांच्या ताब्यात घेतली.
इचलकरंजीकरांचा करविरला वेढा..
इचलकरंजीकर
हे लढाया होऊ नयेत यासाठी वारंवार प्रयत्न करीत होते. मात्र करवीर
घराकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. या काळात व्यंकटराव पुण्यात
होते ते पुण्यातून परत आल्यानंतर पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी
करवीरकरांच्या वर चाल केली. दोन्ही सैन्यामध्ये वडगाव या ठिकाणी मोठे
युद्ध झाले. त्यातही करवीरकरांचा पराजय झाला. त्यानंतर या फौजने करविर ला
वेढा घातला व तेथील मंगळवार पेठ व गंगावेश मधील मठ ही लुटले. त्यादिवशी
लढाई झाली. त्यानंतर करवीरकर यांनी एक लाख रुपये देऊन हा वेढा उठविला. सण
1783 मध्ये अनुबाई चा मृत्यू झाला. त्यावेळी या संस्थानावर सुमारे बारा
लाख रुपये कर्ज होते. इचलकरंजी संस्थानावर जप्तीची वेळ आली. त्यावेळी
रघुनाथराव कुरुंदवाडकर यांनी मदत केली. इचलकरंजी संस्थांनाला एका
प्रकरणात सव्वा लाख रुपये भुर्दंड सरकारकडे भरावा लागला. त्याचबरोबर पाच
लाख रुपये करवीरकर यांच्यावर लढाईसाठी खर्च झाले होते. त्यामुळे संस्थांना
वर कर्जाचा बोजा वाढला होता.
No comments:
Post a Comment