इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ
रुईच्या झाडाचे चिक पिऊन आत्महत्या
एका बाजूला संस्थांना वर कर्जाचा बोजा तर दुसर्या
बाजूस व्यंकटराव यांना व्यसन लागले होते .त्यामुळे संस्थानीकातील
नागरिकांच्या मध्येही त्यांच्याबाबत खदखद निर्माण झाली
होती.कुरुंदवाडकरांच्या देखरेखीखाली इचलकरंजीचा कारभार सुरू असताना वर्षभर
व्यंकटरावांनी प्रायचित्त म्हणून टाकळी येथे रहावे असे ठरले. ते त्यांनी
मंजूर केले, मात्र हा अपमान त्यांना सहन झाला नाही. पालखीचा एका भोयाकडून
त्यांनी पाय दुखत असल्याचे सांगून रुईचा चीक मागवला. तो पिऊन त्यांनी 2
जानेवारी 1795 ला आत्महत्या केली. व्यंकटराव यांच्या पत्नी रमाबाई यांनी
दुसरे नारायणराव व्यंकटेश उर्फ बाबासाहेब यांना दत्तक घेतले. खर्ड्याच्या
लढाईत त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. नारायणराव व्यंकटेश यांनीही
करवीरकरांकडून बराच उपद्रव झाला.1818 नंतर पेशव्यांच्या ठिकाणी इंग्रज
सरकार आले. इंग्रजी राज्य सुरू झाल्यानंतर एकमेकात होणाऱ्या लढाया किंवा
तंटयाबाबत इंग्रज सरकार हस्तक्षेप करू लागले. तरीही 1819 मध्ये करवीरकर
यांनी आजरे प्रांती दंगा करून अनेक खेड्यात लयलूट आणि जाळपोळ केली.1820
मध्ये मराठी सरदारांची इंग्रज सरकारच्या अल्फन्स्टन साहेबांनी पुण्यात भेट
आयोजित केली. त्यावेळी त्यांनी नारायणराव व्यंकटेश यांना मेजवानी देऊन
हत्ती-घोडे व जवाहीर दिली व त्यांचा मोठा बहुमान केला. त्यानंतर
अल्फन्स्टन यांनीही इचलकरंजीत बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
दुसरे नारायणराव व्यंकटेश हे पराक्रमी व धोरणी सरदार होते. आपत्तीच्या
स्थितीतही कर्तबगारीची पराकाष्टा करून त्यांनी इचलकरंजी संस्थान वाचवले
होते.वयाच्या 50 व्या वर्षी 3 जानेवारी 1827 मध्ये त्यांचे निधन झाले.
त्यानंतर त्यांचे थोरले पुत्र तिसरे व्यंकटराव नारायण गादीवर आले. (
क्रमशा:)
No comments:
Post a Comment