इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ
इचलकरंजी
संस्थांनाचा विस्तार वाढत होता मात्र इचलकरंजी गावाची गावकूस निश्चित
नव्हती.त्यामुळे 1739 मध्ये व्यंकटरावांनी इचलकरंजीचे ठाणे बांधण्याची
सुरुवात केली. गाव कुसाची अमुक उंचीचा व रुंदीचा भाग रयतेपैकी प्रत्येक
कुळांनी बांधून द्यावा, असा ठराव केला. त्यांनी गावकऱ्यांकडून सक्तीचे
गावकुस बांधून घेतले. त्यामुळे इचलकरंजी गावात गावकुस तयार होऊन संरक्षण
निर्माण झाले. 1737 मध्ये मराठी आणि पोर्तुगीज यांच्यात युद्ध सुरू झाले.
हे युद्ध चार वर्षे सुरू होते. साताऱ्यातील सैन्य या युद्धात कमी पडू
लागल्यामुळे इचलकरंजी सैन्य मदत मदतीला गेले. सलग दोन वर्षे व्यंकटराव या
मोहिमेत होते. त्यामुळे 1738 मध्ये राणोजी घोरपडे यांनी व्यंकटरावांना
लाट( सध्याचे अब्दुल लाट ता. शिरोळ) गाव इनाम दिले. गोव्या वरच्या दोन
स्वरात व्यंकटरावांनी जितका मुलुख जिंकला होता तो सर्व मुलुख शाहू
महाराजांनी व्यंकटरावांकडें जहागीर म्हणून वहिवाटीत ठेवला होता.
गोव्याच्या दुसऱ्या स्वारी वरून परत आल्यानंतर सण 1739 मध्ये करवीरवासी
संभाजी महाराज यांनी व्यंकटराव यांना सुळकुड, टाकळी दोन्ही शिर्दवाडे (
सध्याचे शिरदवाड ) इनाम दिले. व्यंकटराव यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी
संस्थानाच्या प्रगतीचा आलेख उंचावत होता.
या कालावधित जे महत्वाचे काम झाले ते गावकूस बांधण्याचे. संस्थानाची
स्थापना होऊन अनेक वर्षे उलटली होती. मात्र गावाला निश्चित क्षेत्र
नव्हते. संस्थान सुरक्षित करण्यासाठी त्यांनी इचलकरंजीला ठाणे व गावकुस
बांधण्यास सुरुवात केली. प्रथम ठाणे बांधण्यात आले आणि त्यानंतर गावकूस
बांधण्यास सुरुवात झाली. यासाठी गावातील जनतेचा वापर करण्यात आला. विशिष्ट
उंची व लांबीचे गावकूस सक्तीने प्रत्येक कुळाकडून बांधून घेतले.
गावकुसामुळे गावाच्या सीमा निश्चित झाल्या. आणि इचलकरंजी संस्थानच्या
गावाची गावकूस या निमित्ताने निश्चित्त झाली.
( क्रमशा:)
No comments:
Post a Comment