विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 September 2022

महाराष्ट्रातील प्रथम महाराणी नागनिका

 


महाराष्ट्रातील प्रथम महाराणी नागनिका
पोस्तसांभार ::मराठी विश्वकोश 
नागनिका: (इ. स. पू. दुसरे शतक). सातवाहन राजवंशातील एक प्रसिद्ध राणी. नागनिका (नायनिका) ही बलाढ्य सातवाहन नृपती प्रथम सातकर्णी याची राणी. प्राचीन काळी निका हा शब्द स्त्री या अर्थी योजित असत. उदा., शकनिका म्हणजे शक स्त्री. तेव्हा नागनिका ही प्राचीन नागवंशात जन्मली होती, हे उघड आहे.
पुण्याच्या उत्तरेस सु. ९० किमी. वर असलेल्या नाणेघाटनामक प्रसिद्ध घाटात एका लेण्यात सातवाहनकालीन कोरीव लेख आहेत. त्यांवरून नागनिकेविषयी बरीच माहिती मिळते. याशिवाय त्या लेण्यात सातवाहन वंशातील व्यक्तींचे व त्यांच्या नातेवाइकांचे पुतळे कोरून त्यांच्या खाली त्यांची नावे कोरली होती. सर्व पुतळे आता नष्ट झाले असले, तरी त्यांखालचे काही लेख अद्यापि अवशिष्ट आहेत. त्यांपैकी एका जोडपुतळ्याच्या पाठीवर देवी नागनिका आणि श्री सातकर्णी असा लेख आहे. त्यावरून ती सातकर्णीची राणी होती असे कळते. त्याशिवाय जवळच्या तीन पुतळ्यांवर तिच्या तीन कुमारांची नावे होती. त्यांपैकी ‘कुमार भाय’ एवढेच अवशिष्ट आहे. दुसऱ्या दोघांची नावे नष्ट झाली आहेत.
याशिवाय तेथील लेण्यांत स्वतः नागनिकेचा एक प्रदीर्घ लेख कोरला होता. तो आता बराच भग्न झाला असला, तरी त्याच्या अवशिष्ट भागावरून नागनिकेविषयी बरीच माहिती मिळते.
हा लेख नागनिकेच्या वृद्धापकाळी तिचा पुत्र दक्षिणापथपती, शूर व अप्रतिहतचक्र वेदिश्री याच्या कारकीर्दीत कोरविला होता. त्यात नागनिकेविषयी म्हटले आहे की, ती अंगियकुलवर्धन कललायनामक महास्त्रीची कन्या, अत्यंत श्रेष्ठ अशा सातकर्णीची भार्या आणि वेदिश्री राजाची व श्रीमान सती (शक्ती) याची माता होती. या लेखात कुमार भाय याचा निर्देश नाही, याचे कारण तो त्या वेळी निधन पावला असावा.
या लेखात नंतर नागनिकेने सातकर्णी राजाबरोबर केलेल्या अनेक श्रौत यज्ञांचा–उदा., दोन अश्वमेध व एक राजसूय तसेच अग्न्याधेय, अनारंभणीय, गवामयन, भगालदशरात्र, आप्तोर्याम, अंगिरसामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसात्रिरात्र, शतातिरात्र इत्यादिकांचा–निर्देश आहे. तसेच पतिनिधनानंतर तिने स्वयं (स्वतः) करविलेल्या अंगिरसामयन, त्रयोदशरात्र, दशरात्र इ. व्रतांचा उल्लेख आहे. या सर्व यज्ञांच्या नामनिर्देशांबरोबर ब्राह्मणांना दिलेल्या हजारो गाई, हत्ती, घोडे, रथ, कार्षापण नाणी, सोन्याचांदीचे अलंकार इत्यादींचा सविस्तर उल्लेख आहे. त्यावरून तत्कालीन सातवाहन नृपतींच्या वैभवाची व त्यांच्या धार्मिकत्वाची कल्पना येते.
या लेखाच्या आरंभी इतर काही देवांबरोबर कुमारवराला (कार्तिकेयाला) नमन आहे पण कुमारवर याचा राजकुमार वेदिश्री असा चुकीचा अर्थ लावल्यामुळे काही तज्ञांचा असा समज झाला होता की, प्रस्तुत लेख वेदिश्री याच्या लहानपणी कोरला गेला असावा आणि त्या वेळी नागनिका ही स्वतः राज्यकारभार पाहत होती पण तो समज चुकीचा आहे कारण त्याच लेखात नागनिकेचे पुढील वर्णन आले आहे : ‘ती महिना-महिना उपवास करते, आपल्या प्रासादातही तापसीप्रमाणे, साधेपणाने राहते, ब्रह्मचर्यव्रताचे पालन करते आणि व्रते व यज्ञ करण्यात तर आपले नैपुण्य दाखविते.’
प्राचीन भारतातील अत्यंत प्रसिद्ध स्त्रियांमध्ये नागनिकेची गणना केली पाहिजे.
संदर्भ : मिराशी, वा. वि. संशोधन-मुक्तावलि, सर्ग आठवा, नागपूर, १९७७.
मिराशी, वा. वि.
 शतकर्णी की मृत्यु के समय उसके दो पुत्र वेदन्थी और शक्तिश्री नाबालिग थे, इसलिए उनकी माँ नागनिका ने उनकी संरक्षिका बनकर राज्यकार्य का संचालन किया. सातवाहन वंश का इसके आगे का इतिहास अन्धकारमय है. (यद्यपि इस 100 वर्ष के शासकों के नामों में हकुश्री, सातिश्री, स्कंद स्तम्भि, शातकर्णी द्वितीय, अपीलक, हाल आदि के नाम प्राप्त होते हैं). इसी काल में लगभग 78 ई० में शकों का दूसरा आक्रमण भारत पर हुआ और शकों ने महाराष्ट्र पर अधिकार कर लिया. महाराष्ट्र में शकों का जो राजवंश स्थापित हुआ था उसका नाम क्षहरात था. शक क्षत्रप नहपान के जो सिक्‍के एवं अभिलेख नासिक प्रदेश के आस-पास से प्राप्त हुए हैं वे भी इस बात के प्रमाण हैं कि प्रथम शताब्दी के अन्त अथवा दूसरी शताब्दी के प्रारम्भ में इस क्षेत्र पर शक अधिकार कर चुके थे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...