सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच !
संदर्भ : दैनिक पुढारी (बहार ) , रविवार, दि.२८ नोव्हेंबर १९९९ .
लेखन : अभिजीत पाटील
अन्यायाची परमावधी
किंबहुना एकाच देशातील लोक पक्ष, संघटना, संस्था अनेक कारणांनी भांडता.ते एकमेकांचे विरोध अलंकारीकरित्या शत्रुपक्ष म्हणने इथपर्यंत ठिक, पण वारंवार शत्रु, सूर्याजी पिसाळ, राय नाईक (रायनाक),,आनंदीबाई (’ध’ चा ’मा’ ), दुसरे बाजीराव (पळपुटा) असे जर आपण म्हणत राहीलो तर त्या एतिहासिक व्यक्तिंवर आपण सारे घोर अन्याय करतो.उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होऊ नये. Tell a lie hundred times and it become a truth - खोटे शंभर वेळा सांगा अन ते सत्यच ठरते.या हिटलरी न्यायाने असत्ये सत्य म्हणुन लोक स्वीकारतात. याचे भानही बोलणार्यास, लिहिणार्यास राहात नाही. गैरसमज खोडुन सत्य प्रस्थापित करणे अवघड होते.नुकसान होऊन जाते.इतिहासकारांनी ते काम करु नये.त्यांचे काम सत्य मांडणे.
शेवटी पुनश्च लक्षात घेऊया की, रायगड व राजकुटूंब सूर्याजी पिसाळांच्या फ़ितूरी,विश्वासघातकीपणा, स्वार्थी यामुळे शत्रुच्या ताब्यात गेलेले नाही.तसे झाले असते तर इतर मराठा मंडळातील सरदार-दरकदारांनी सूर्याजींचा खातमा तात्काळ केला असता.बादशाहाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापणारे छ,राजारामांचे तरुण साथीदार आणि सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी सूर्याजी पिसाळांना शिल्लक ठेवले नसते.राजारामांनी त्यांची कन्या त्यांच्या पुत्रास दिली नसती. रायगडावर वेढ्याच्यावेळी त्यांचे तेथे आस्तित्व नव्हते.मोठी लढाई रायगड काबीज करताना झालेली नाही.
शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ ९ वर्षाचे होते.राणी येसूबाई आणि त्यांचे सल्लागार मराठा मंडळाने ’ शांतपणे शरण जाण्यातच शाहूंचे व सर्वांचे कल्याण आहे’ असा विचार तो बरोबरच. मराठेशाहीत अन बिकट प्रसंगाच्या युद्धात किल्ल्यांच्या आणि माघारीबाबत हाच विचार क्रुतीत आणला जात असे/जातो."शक्य तेवढा प्रतिकार अशक्य झाल्यास कमीत कमी नुकसान सोसून किल्ला स्वाधीन करणे हेच धोरण मराठ्यांनी औरंगजेबच्या दक्षिण स्वारीचा जोर ओसरेपर्यंत स्वीकारले.’......’ तेच धोरण राणी येसूबाईंनी अमलात आणले.
सूर्याजीने ना गडाचा दस्तुरखुद्द दरवाजा उघडला ना फ़ितुरी केली हे नि:संशय. येथुन पुढे फ़ितूर "फ़ितूरच" , सूर्याजी पिसाळ नव्हे.
(पूरक माहीती : श्री नरसिंगराव पिसाळ-देशमुख,ओझर्डे; श्री राम राजेशिरके, कोल्हापूर; अनेक इतिहासग्रंथ)
व्यवस्थापक / लेखक : श्री.अभिजीत पाटील
No comments:
Post a Comment