पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ
बडोदा येथील गायकवाड घराणे-6
हिंदुस्थानातील अनेक संस्थानांचे स्वातंत्र्य तसे बघायला गेलो तर 1818 च्या आसपास ब्रिटिश सत्तेपाशी संपुष्टात आल्यात जमा होते. जरीपटका मागे पडून कालगतीमुळे इंग्रजांचा युनियन जॅक हा ध्वज बहुतांशी संस्थानांवर दाब राखून होता. अनेक संस्थाने अस्तित्व राखण्यासाठी हरप्रयत्नाने ब्रिटिश सरकारच्या सुधारकी धोरणांशी जुळवू पाहात होती. अशा परिस्थितीत बडोद्याचे सर्वोत्तम राज्यकर्ते म्हणून सयाजीराव महाराज तिसरे हे राजगादीवर आले.
बडोदा संस्थानचे सुवर्णयुग, महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे – 1
बडोद्याच्या राजगादीवर अनेकविध राज्यकर्ते होऊन गेले असले तरी एकूण आढावा घेता बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड तिसरे हे या सर्वांचे मुकुटमणी म्हटले तर ती खचितच अतिशयोक्ती ठरू नये, इतके सर्वांगीण कार्य सयाजीराव महाराजांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत करून ठेवले आहे. आणि बडोद्याच्या इतिहासात स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे, अशी अत्युत्तम कामगिरी केलेली आहे. यात अभ्यासकांच्या मनात कोणतीही शंका नाही. मल्हारराव महाराजांच्या काहीशा वादग्रस्त राजवटीनंतर बडोद्याच्या राजगादीच्या वारसाहक्काचा प्रश्न उद्भवला असता मल्हाररावांचे दिवंगत बंधू खंडेराव महाराजांच्या पत्नी महाराणी जमनाबाईसाहेब यांनाही कन्यारत्न झाले होते. अशा परिस्थितीत ब्रिटिश सरकारच्या बडोदा संस्थानच्या रेसिडेंटने लोकमानसाचा अंदाज घेत प्रसारित केलेल्या जाहिरनाम्यातील एका कलमात असे म्हटले होते की ‘खंडेरावांची विधवा पत्नी राणी जमनाबाई साहेब यांनी हिंदुस्थान सरकार सत्पात्र ठरवून ज्याच्या हाती बडोद्याची सत्ता सोपविण्यास तयार होईल, अशा गायकवाड घराण्यातील एखाद्या व्यक्तीस दत्तक घ्यावे.’ ब्रिटिशांच्या जाहिरनाम्यातील या कलमाने बडोद्याच्या प्रजेला खरोखरीच आश्चर्याचा धक्का दिला होता. मल्हाररावांच्या पदच्युतीनंतर रेसिडेंटने परिस्थिती काबूत आणून तात्काळ इंदूर संस्थानात मंत्रिपदावर असणार्या सर टी. माधवराव यांची 10 मे, 1875 रोजी बडोद्याच्या दिवाणपदी नेमणूक केली. रेसिडेंट सर रिचर्ड मीड, टी. माधवराव व बडोद्याला बोलावून घेतलेल्या राणी जमनाबाईसाहेब यांच्या संयुक्त ठशसशपलू र्उेीपलळश्र ने तातडीने ‘अत्यंत सुयोग्य व्यक्ती’चा शोध सुरू केला.
बडोद्यातील गायकवाड घराण्यातील वारसदारांपैकी कोणीही परिपूर्ण न
वाटल्याने मग बडोद्याच्या बाहेर शोध सुरू झाला. या वेळी त्यांची नजर
खानदेशातील गायकवाडांच्या शाखेकडे वळली. मध्य रेल्वेच्या मनमाड स्टेशनपासून
अवघ्या 18 मैलांवरील कवळाणे या छोट्याशा खेड्यातील कनिष्ठ शाखेवर आता
दैवाची मेहेरनजर होऊन तिथे स्थायिक झालेले प्रतापरावांचे वंशज होते,
त्यांच्याकडे जणू हा वारसा आपोआपच चालून आला. खंडेराव व मल्हारराव यांनी
अधूनमधून या आपल्या दूरस्थ नातेवाइकांना भेटी दिल्याच्या नोंदी आहेत. या
वेळी तेथे प्रतापरावांचे पाच पुत्र हयात होते, ज्यात एक काशिराव असून
त्यांना आनंदराव, गोपाळराव व संपतराव असे तीन पुत्र होते. मात्र खुद्द
प्रतापराव हे पिलाजीराव यांचे अनौरस पुत्ररत्न असल्याने बडोद्याच्या
राजगादीवर त्यांचा हक्क पोहोचत नाही, अशीही वदंता तेव्हा संस्थानात होती.
मात्र नाशिक, त्र्यंबक व पंढरपूर येथील गायकवाडांच्या उपाध्यायांनी
ठेवलेल्या नोंदीत प्रतापरावांचा उल्लेख आढळला आणि मग वारसाहक्काचा मार्ग
सुकर होऊन अखेर राणी जमनाबाईसाहेबांनी काशिरावांचा बारा वर्षांचा द्वितीय
पुत्र गोपाळराव यांना बडोद्याच्या राजगादीचे भावी वारसदार म्हणून निवडले.
अशा रीतीने बडोद्याच्या भावी सुवर्णयुगाचा नवा अध्याय एका विलक्षण पद्धतीने
सुरू झाला, असे म्हणता येईल.
वादग्रस्त कारकीर्द यापुढे शक्यतो न राहता एखाद्या अज्ञान मुलाची राजगादीवर
निवड करून त्यास उत्तम प्रकारे राजशिक्षण देऊन तयार करावे, असा ब्रिटिश
सरकारचा मानस होता. याचसोबत त्यांना असेही वाटत असावे की, या निर्णयामुळे
काही काळपर्यंत सार्वभौम ब्रिटिश सत्ता आणि बडोदा संस्थान यांच्यातील अनेक
अनिर्णित प्रश्न मार्गी लावता येतील. तर आधीच रहिमतपूर गावच्या असल्याने
स्थानिक गायकवाड आप्त/नातेवाईक राणी जमनाबाईसाहेबांना उपर्या समजत.
त्यामुळे एकाच अर्थाने त्याही बडोद्याबाहेरील कुटुंबातील वारस बघण्यास
उत्सुक होत्या. अशा प्राप्त परिस्थितीत सयाजीराव तिसरे उर्फ गोपाळराव हे
काशिराव आणि उमाबाई गायकवाड यांच्या पोटी जन्मलेले सुपुत्र आश्चर्यकारक
रीतीने रातोरात शेतकर्याचा मुलगा ते एका वैभवशाली संस्थानचे सर्वेसर्वा
झाले, हा नियतीचा अद्भुत अकल्पित योगच म्हणावा लागेल. जमनाबाईसाहेबांचा
निःसंदिग्ध होकार मिळताच रेसिडेंट मीड, दिवाण माधवराव, बडोद्याचे अन्य
सरदार यांचीही या निर्णयास अनुमती मिळाली. राणी जमनाबाई साहेबांनी दि. 27
मे, 1875 रोजीच्या सुमुहूर्तावर गोपाळराव यास पारंपरिक रीतीने विधिपूर्वक
दत्तक घेतले. रेसिडेंट सर रिचर्ड मीड यांनी तर या 12 वर्षांच्या राजास
अक्षरशः उचलून राजसिंहासनावर बसविले. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी श्री.
एलियट यांच्यावर सोपवलेली होती. महाराजांना इंग्रजी, मराठी, गुजराती व
उर्दू या भाषांच्या शिक्षणासह इतिहास, भूगोल, प्राथमिक गणित हे विषयदेखील
शिकवण्यात येत होते. हिंदी संस्थानिक या नात्याने कायद्यांचा अभ्यासही
गरजेचा होता. एलियट यांना सुरुवातीस काहीसे अपेक्षित असे न वाटणारे
सयाजीराव महाराज पुढे त्यांनीच आपल्या ‘रूलर्स आफ बडोदा’ या ग्रंथात अतिशय
चिकाटीचे आहेत, असे लिहिले आहे.
एकूणच पाहता सयाजीराव महाराज तिसरे यांची निवड ही पुढे जाऊन बडोदा संस्थानच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरली. सयाजीरावांनी आपल्या कारकीर्दीत तांब्याची तसेच चांदीची आणि सोन्याचीही नाणी (मोहोर) पाडली होती. तांब्याच्या नाण्यांत हाती पाडलेली (र्लीीवश लेळपी), सेमीमशिनस्ट्रक नाणी तसेच संपूर्णपणे मशिनद्वारे पाडलेली नाणी आहेत. क्रूड नाण्यांमध्ये आडवी सरळ तलवार, आद्याक्षरे ‘सा। गा ‘सात पाकळ्यांचे फुल, आडवी वक्राकार तलवार, बिंदूमय वर्तुळात दिसणारा सूर्य, हिजरी सन अशी चिन्हे आढळतात. या प्रकारच्या नाण्यांवरील तलवारीचे प्रकार/मुठी या अतिशय देखण्या अशा आहेत. याचसोबत अजून एका पैसा मूल्याच्या नाण्यावर शेडेडबॉल/तोफगोळा तसेच हिजरी सन पण छापलेले दिसते. सेमीमशिनस्ट्रक प्रकारच्या अर्धापैसा, एक पैसा तसेच दोन पैसे (र्वेीलश्रश रिळीर) मूल्याच्या नाण्यांवर पण तीन दांड्या असलेला ‘सा गा’ ही आद्याक्षरं, शेडेड बॉल, खाली आडवी तलवार आणि दुसर्या बाजूस देवनागरीत विक्रमसंवत तसेच नाण्याचे मूल्य छापलेले आढळते. याप्रकारची नाणी बघायला बरीचशी सुबक अशी आहेत. संपूर्णपणे मशिनद्वारे पाडलेल्या नाण्यांमध्ये एक पै, एक पैसा आणि दोन पैसे या मूल्याची नाणी आहेत. ही अतिशय सुबक आणि उठावदार अशी नाणी आहेत. यातील एक पैच्या नाण्यावर एका बाजूस नाण्याच्या वर्तुळाकार बाजूने देवनागरीत ‘श्री गायकवाड, बडोदे’ तर मध्यभागी ‘सरकार’ आणि त्याखाली घोड्याचा खूर तसेच आडवी तलवार छापलेली आढळून येते. तर उर्वरित बाजूला वर्तुळाकार नक्षीदार डिझाइनच्या मध्ये देवनागरीत नाण्याचे मूल्य ‘एक पै’ आणि विक्रमसंवत छापलेले असते. यातील विक्रमसंवत 1944 च्या एक पैवर ‘सरकार , घोड्याचा खूर/टाप, तलवार यासह नाण्याच्या कडेने ‘श्री स.रा.म.गा.’ (सयाजीराव महाराज गायकवाड) आणि स.श.बा. ही आद्याक्षरे सहा बिंदूंच्या नक्षीसह छापलेली आढळतात. वजनाने थोडे जास्त असलेले विक्रमसंवत 1940 व 1941 या वर्षीच्या नाण्यांवर देवनागरीत एक पैसा आणि विक्रमसंवत नमूद केलेले आहे तसेच दुसर्या बाजूस नाण्याच्या कडेने वर्तुळाकार रीतीने श्री सयाजीराव (महाराज) गायकवाड, सेनाखासखेल समशेरबहाद्दर यासोबत मध्यभागी वक्राकार अक्षरात लिहिलेले ‘सरकार’ तसेच घोड्याचा खूर आणि तलवार दर्शवलेली आहे. यानंतरच्या वर्षातील नाण्यांचे वजनही कमी असून बाकी सर्व तपशील याप्रमाणेच असून, ‘सरकार’ हा शब्द सरळ अक्षरात लिहिलेला आहे. दोन पैशाच्या नाण्यावरदेखील विक्रमसंवत 1940/1941 आणि बाकीच्या वर्षांतील नाण्यांवर सर्वच तपशील एक पैशाच्या नाण्यांबरहुकूम आढळून येतो. ही मशिनद्वारे पाडलेली नाणी बघायला अन् हाताळायला मात्र अतिशय सुबक अशी आहेत. सयाजीराव महाराजांच्या चांदीच्या नाण्यांची माहिती आपण यानंतरच्या लेखात पाहू या.
No comments:
Post a Comment