ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – भाग 6
भारतातील झांशी संस्थानच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर आणि ग्वाल्हेरच्या महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे यांची नावे ध्रुवतार्याप्रमाणे अढळपदी विराजमान आहेत.
मराठेशाहीच्या इतिहासात कर्तबगार राजस्त्रिया राज्यकर्त्यांची नावे घ्यायची झाली तर शिवछत्रपतींच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब, शिवस्नुषा शंभुपत्नी महाराणी येसूबाईसाहेब, शिवस्नुषा राजारामपत्नी आणि करवीर संस्थानच्या संस्थापिका ताराराणीसाहेब, इंदोर संस्थानच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहेब, मध्य भारतातील झांशी संस्थानच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर आणि ग्वाल्हेरच्या महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे यांची नावे ध्रुवतार्याप्रमाणे अढळपदी विराजमान आहेत.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शिकस्तीने काम स्त्रियाही करतात हे वारंवार सिद्ध झालेले आहे. सरलष्कर महाराजसाहेब शहाजीराजे हे आदिलशाहीच्या वतीने बंगलोर येथे वास्तव्यास असताना महाराष्ट्रदेशी पुणे सुपे जहागिरीचा कारभार जिजाऊसाहेबांनी बाल शिवबास घेऊन समर्थपणे सांभाळला, वाढवला. शंभाजी महाराजांच्या ज्वलज्वलन तेजस् वृत्तीला येसूबाईसाहेबांनी नंदादीपाच्या स्निग्ध प्रकाशागत साथ देऊन पतीच्या निर्घृण हत्येनंतर धोरणीपणाने निर्णय घेऊन मराठेशाहीचा अंगार पेटता ठेवला. पती राजाराम महाराजांच्या अवेळी झालेल्या निधनानंतर ताराराणीने औरंगजेब आलमगीराशी उभा दावा मांडून झुंज दिली आणि करवीर संस्थानची स्थापना केली. झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाईंचे तेजस्वी उद्गार – ‘मेरी झाँशी नही दूँगी’- जसे इतिहासात दगडावरील रेषेप्रमाणे कोरले गेलेत तसेच ताराराणीसाहेबांचे पुढील उद्गार – यवनाधमाचा (औरंगजेबाचा) हिसाब (भीती) तो काय राखायचा?’ – हे देखील अनन्यसाधारण महत्त्वपूर्णच आहे. पती खंडेराव, पुत्र मालेराव, श्वशुर मल्हारराव पहिले, कन्या मुक्ता आणि जावई यांचे वेळी-अवेळी मृत्यू डोळ्यासमोर होऊनही पुण्यश्लोक अहिल्याबाई रायगडाच्या अविचल वृत्तीने समाजहितासाठी आजन्म कार्यरत राहिल्या. याचप्रमाणे शिंदेशाहीचे बलवत्तर नेतृत्व आणि आपले श्वशुर महादजी शिंदे तसेच पती दौलतराव शिंदे यांच्या पश्चात धीराने, हिमतीने मध्य हिंदुस्थानात शिंदेशाहीचा पर्यायाने मराठेशाहीचा डोलारा सांभाळणार्या ‘महाराणी बायजाबाई शिंदेसाहेब’ यादेखील मराठेशाहीच्या इतिहासात अजरामर झाल्या.
बायजाबाई या देखील अहिल्याबाईंप्रमाणे महाराष्ट्रकन्या. कागल येथील
घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. वडील सर्जेराव घाटगे हे परशुरामभाऊ
पटवर्धन यांचे पदरी होते. पटवर्धनांच्या वतीने आणि नाना फडणवीसांच्या
आग्रहामुळे ते पंतप्रधान पेशव्यांच्या पुणे दरबारात राजनैतिक कामांसाठी
उपस्थित असत. याचप्रमाणे महादजींचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे हेदेखील
ग्वाल्हेर संस्थानच्या वतीने सुरुवातीला पुणे दरबारात राजनैतिक घडामोडी
सांभाळण्यासाठी असत. दुसर्या बाजीरावांनी दौलतराव आणि बायजाबाई यांच्या
विवाहाचा प्रस्ताव मांडला आणि मार्च 1798 मध्ये हा विवाह संपन्न झाला.
कालांतराने सर्जेराव घाटगे हे दौलतरावांचे अतिशय विश्वासपात्र ठरून
स्वपराक्रमाने त्यांच्या सेनेचे अधिपतीही झाले. बायजाबाईसाहेब देखील
ग्वाल्हेरला आल्यानंतर दरबारी कामकाजात लक्ष घालत असत. बंदूक चालवणे, भाला
फेकणे, घोडेस्वारी करणे अशा कलांमध्ये त्या पारंगत झाल्या होत्या. मात्र
इसवी सन 1810 मध्ये दरबारी वर्चस्वाच्या लढाईत सर्जेरावांची हत्या झाली.
यानंतर सर्जेरावांचा मुलगा आणि बायजाबाईसाहेबांचा भाऊ हिंदुराव उर्फ
जयसिंहराव हा ग्वाल्हेरला दौलतरावांकडे रुजू झाला. कालांतराने 1827 मध्ये
दौलतराव वारले आणि ते निपुत्रिक असल्याने स्वाभाविकच वारसाहक्काचा प्रश्न
उद्भवला. तत्कालीन पुरुषी वर्चस्ववृत्तीच्या राजकीय सगेसोयर्यांना एक
महिला आपल्यावर राज्य करते हे रुचेना, म्हणून धूर्त इंग्रज अधिकार्यांच्या
स्वार्थी सहमतीने बायजाबाईंनी शिंदेकुलोत्पन्नांपैकीच एक मुकुटराव नामक
मुलास दत्तक घेतले. हा पुढे ‘जनकोजीराव अथवा जनकुजीराव’ (नाण्यांवर असलेले
नाव) या नावाने प्रसिद्ध झाला.
बायजाबाई या कुशल प्रशासक होत्या. त्यामानाने जनकोजीराव हा वयाने, अनुभवाने
लहान असल्याने त्यांनी समर्थपणे, धूर्तपणे ग्वाल्हेरचे राज्यशकट हाकायला
सुरुवात केली. जनकोजीराव हे राज्यकारभारातही मानसिकदृष्ट्या तितके सक्षम
नव्हते. म्हणूनच चाणाक्ष ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासकांना ते आपल्या
कह्यात राहावेत, जेणेकरून राज्याच्या नाड्या आपल्या हातात राहतील असा फासा
टाकायचा होता. याचमुळे त्यांनी शिंद्यांच्या दरबारातील असंतुष्टांना हाती
धरून, जनकोजीरावांना राज्यकारभार करण्यास न देणे आणि राज्यात अराजक माजवणे
अशा आरोपांखाली बायजाबाईसाहेबांना ग्वाल्हेरच्या बाहेर निर्वासित केले.
मात्र याच बायजाबाईंच्या राज्यकारभाराचं कौतुक समकालीन इंग्रजी लोकांनी
अनेकदा केलेले आहे. 1832 च्या इंडिया गझेट मधील नोंद सांगते – ढहश
ठशसशपींलरशश (बायजाबाई) लेपर्वीलीीं ींहश रषषरळीी ेष ींहळी ीींरींश
(ग्वाल्हेर) ुळींह सीशरीं ीशर्सीश्ररीळीूं, र्ाीलह लशीींंशी, ख
र्ीपवशीीींरपव, ींहरप ुहरीं ुरी वेपश ळप ींहश ींळाश ेष श्ररींश चरहरीरक्षर
(दौलतराव). मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी बायजाबाईंचा कारभार बघता त्यांनाच
आपला उत्तराधिकारी करण्याचा दौलतरावांचा निर्णय किती योग्य होता हे कळते.
तसेच त्या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या, असे 1833 मध्ये लिहिले आहे.
परंतु दत्तकपुत्र जनकोजीने अखेर 1833 मध्ये बायजाबाईंच्या विरोधात बंड
पुकारलं आणि खुद्द बायजाबाईसाहेबांना अटक होण्याची परिस्थिती आली असताना
त्या भाऊ हिंदुराव याच्या आश्रयास गेल्या. त्यांनी ब्रिटिश रेसिडेंटकडेही
मदत मागितली; पण तरीही जनकोजीचे पारडे जड राहून नाइलाजास्तव त्यांना
ग्वाल्हेरहून परागंदा व्हावे लागले. सुमारे 6-7 वर्षे त्या धोलपूर,
अलाहाबाद, वाराणशी, फत्तेगढ अशा फिरत राहून अखेर नाशिकला येऊन 1840 – 1845
अशी पाच वर्षे त्या तिथे राहिल्या. शेवटी 1843 मध्ये जनकोजीराव मृत्यू
पावले आणि तेही निपुत्रिक असल्याने त्यांच्या पत्नी ताराबाईने भगीरथराव
नामक 8 वर्षे वयाच्या नात्यातील मुलाला दत्तक घेतले आणि तो जयाजीराव या
नावाने शिंदेशाहीचा कारभार बघू लागला. याच काळात बायजाबाई पुन्हा
ग्वाल्हेरला परतल्या. पुढे 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात बंड
करणार्यांनी ग्वाल्हेरसह आपणही या संग्रामात सहभागी व्हावे, अशी विनंती
केली पण बायजाबाईंनी ती नाकारली. मात्र 1858 ला राणी लक्ष्मीबाई, तात्या
टोपे, पेशवे, बांदा संस्थानचे नवाब आदींनी हल्ला करून ग्वाल्हेर ताब्यात
घेतले. खुद्द जयाजीराव आणि दिवाण दिनकरराव राजवाडे यांना आग्य्रास पळून
जावे लागले. राजस्त्रियांना राजवाड्याबाहेर पडावे लागले. संपूर्ण खजिना
त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या हाती लागला. मात्र लगेचच ब्रिटिशांनी
ग्वाल्हेर जिंकून जयाजीराव आणि बायजाबाईंना पुन्हा प्रस्थापित केले.
बायजाबाईसाहेब जयाजीराव शिंदे यांच्यासह राहू लागल्या. अखेर 27 जून 1863
रोजी तब्बल 6 दशके ग्वाल्हेरची स्थित्यंतरे, चढउतार बघितलेल्या या महाराणी
बायजाबाईसाहेबांचे निधन झाले.
बायजाबाईसाहेबांनी आपल्या कारकीर्दीत अजयमेरू उर्फ अजमेर, बुरहाणपूर,
ग्वाल्हेर, लष्कर, शेवपूर, उज्जैन, सिप्री इत्यादी टांकसाळीत आपली श्री
चिन्हांकित नाणी पाडलेली आढळतात. अतिशय सुबक, ठसठशीत अशी ही चांदीची तसेच
तांब्याची नाणी आहेत.
No comments:
Post a Comment