विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 November 2022

ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – भाग ७

 

ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – भाग ७

 रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठी नानी संग्राहक,लेखक, व्याख्याते | नाणे घाट

राणोजीराव, महादजीराव आदी शिंदेकुलोत्पन्न वीरांनी मध्य हिंदुस्थानात रुजवलेले मराठेशाहीचे रोपटे आता बदलत्या परिस्थितीनुसार दिवसागणिक बलवंत होत चाललेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कलाप्रमाणे चालत होते. पेशवाई कालखंडाचा १८१८ मध्ये झालेला अस्त आणि सातारा तथा करवीर या हिंदवी स्वराज्याची मध्यवर्ती सत्ताकेंद्रेदेखील सामर्थ्यशाली राहिली नव्हती.

बायजाबाई शिंदेंशी अखेर दावा मांडून दत्तकपुत्र जनकोजीराव शिंदेशाहीचे सत्ताधीश झाले खरे, परंतु मुळातच ते राज्यशकट हाकण्यास कमजोर होते. त्यांच्या दरबारात आपसातील वैर अखंड सुरू असायचे आणि त्यांचे सैन्यदेखील कायम बंडाच्या पवित्र्यात असे, अशा नोंदी आहेत. सुरुवातीच्या काळात बायजाबाईसाहेब या राज्यकारभार करण्यास उत्सुक आणि समर्थ असल्याकारणे त्याच जनकोजीरावाच्या सर्वाधिकारी/ ठशसशपीं म्हणून १८३२ पर्यंत शिंदेशाहीचा कारभार बघत होत्या. मात्र आता त्याला स्वतंत्र राज्यकर्ता म्हणून गादीवर येण्याची आकांक्षा वाढली होती. याचमुळे त्याने अखेर ब्रिटिश रेसिडेंटच्या मदतीने बायजाबाईंना पदच्युत करून राज्यकारभार हाती घेतला. बायजाबाईसाहेब अटक टाळण्यासाठी ग्वाल्हेरच्या बाहेर निसटल्या. जनकोजीरावांनी सुमारे १० वर्षे राज्यकारभार केला. ते इसवी सन १८४३ मध्ये निसंतान अवस्थेत मृत्यू पावले. मात्र त्यांनी बासौदा, बुरहाणपूर, ग्वाल्हेर फोर्ट, इसागढ, जावद, लष्कर, सिप्री, उज्जैन आदी अनेक टांकसाळीत पाडलेली चांदीची, तांब्याची नाणी उपलब्ध आहेत. त्यांच्या या नाण्यांवर पर्शियन भाषेतील मजकुराप्रमाणेच देवनागरी भाषादेखील आढळून येते. यातील काही नाण्यांवर ’जनकुजी’ असे लिहिलेले आहे. तसेच त्रिशूळ/भाला, झाडाची छोटी फांदी/ ीींशश श्रशरष, उर्ध्व आणि अधो बाजूला बाणाचे टोक असलेले धनुष्य, सोबत तलवार, देवनागरी लिखावटीत ’ज’, ’जे’ इत्यादी अक्षरे, चवरी, भाल्याचा फाळ, त्रिशूळ, साप/नाग, फुल, वळलेल्या मुठीची तलवार अशी अनेक चिन्हे जनकोजीरावांच्या नाण्यांवर आढळून येतात.
७ फेब्रुवारी १८४३ ला जनकोजीराव फक्त १० वर्षे कारभार करून मरण पावले. पुत्रसंतान नसल्यामुळे त्यांच्या १३ वर्षीय विधवा पत्नी राणी ताराबाईंनी भगीरथराव नामक ८ वर्षांच्या मुलाला दत्तक घेतले आणि हे पुढे ‘जयाजीराव’ शिंदे या नावाने प्रसिद्ध झाले. ताराबाई तसेच जयाजीराव हे तसे अल्पवयीन असल्याने ग्वाल्हेर संस्थानचा कारभार चालवण्यासाठी एका राजमंडळाची निर्मिती केली गेली.

अखेर जानेवारी १८५३ मध्ये जयाजीराव शिंदे यांनी स्वतंत्रपणे राज्यशकट हाती घेतले. जयाजीरावांच्या कारकीर्दीत हिंदुस्थानातील इंग्रज सत्तेविरुद्धचे सुप्रसिद्ध असे १८५७ चे स्वातंत्र्यसमर उद्भवले. परंतु धूर्तपणे जयाजीरावांनी स्वतःला यापासून दूर ठेवले होते. या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अस्त होऊन आता भारताचे शासनसूत्र ब्रिटनची सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया एम्प्रेस (तळलीेींळर एािीशीी) हिच्या हाती आले. जयाजीराव शिंदेंच्या सुमारे ४२-४३ वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत ग्वाल्हेर राज्य आधुनिकीकरणाकडे वळू लागले होते.
कमी-जास्त होत होत अखेरीस ग्वाल्हेर राज्याच्या सीमा अधोरेखित झाल्या होत्या. मराठा – इंग्रज यामधील बरेचसे वादविवाद निवळले गेले होते. पिंढार्‍यांच्या त्रासाचा बंदोबस्त झाला होता. बदललेल्या परिस्थितीप्रमाणे वागून शिंद्यांचे कारभारी दिनकरराव राजवाडे यांनी धूर्तपणा आणि हुशारी दाखवून इंग्रज सत्तेबरोबर चोख व्यवहार केला. याचा सन्मान ठेवून ब्रिटिश सत्तेने जयाजीरावांना अदमासे ३ लाख वार्षिक उत्पन्नाचा भूभाग प्रदान केला. तसेच जयाजीरावांना १८६१ मध्ये र्उेीपीशश्रश्रेी ेष एाळिीश या पदवीने आणि २१ तोफांच्या सलामीने गौरविले. पुढे १८७७ मध्ये त्यांना ब्रिटिश सेनेचे ’ॠशपशीरश्र’ पदवीने आणि ’कम्पनियन ऑफ ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर’ असेही सन्मानित केले.

आधुनिक, प्रगतशील विचारसरणीच्या जयाजीरावांच्या कार्यकाळात ग्वाल्हेर राज्यात रेल्वे, टपाल खाते, डाक-तार विभाग निर्माण झाले. महसुली विभागात पुनर्रचना करण्यात आली. यामुळे ग्वाल्हेरात शेती, व्यापार उदीम, अर्थकारण यात मोठीच प्रगती झाली. अनावश्यक टांकसाळीदेखील विचारविनिमय करून बंद करण्यात आल्या. तसेच टांकसाळ भवनचे निर्माण करून आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी आयात करून मोठ्या संख्येने तसेच सुबक अशी नाणी पाडता येऊ लागली.

महाराजा जयाजीराव शिंदे यांच्या कारकीर्दीत – भिलसा, बुरहाणपूर, दोहाद, ग्वाल्हेर फोर्ट, जावद, झाँशी, लष्कर, मंदसौर, राजोद, शेवपूर, उज्जैन अशा अनेक टांकसाळी कार्यरत होत्या, त्यांमधून चांदीची, तांब्याची नाणी पाडली जात होती. जयाजीरावांच्या नाण्यांवर उर्ध्व तसेच अधोभागी रोखलेले धनुष्यबाण, तलवार, त्रिशूळ, साप/नाग, विविध प्रकारच्या झाडाच्या फांद्या/ीींशश श्रशरष र्ींरीळशींळशी, फूल, तराजू, कट्यार, ध्वज/पताका, भाल्याचा फाळ, राजदंड, हनुमान, शिवलिंग, तोफा/उरपपेप, ’जा, जी, आ, वा’ इत्यादी अक्षरे अशी अनेकानेक चिन्हे आपणास बघावयास मिळतात. याचप्रमाणे हाती पाडलेली नाणी तद्वत मशिनद्वारे पाडलेली नाणीदेखील उपलब्ध आहेत.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जयाजीरावांच्या नाण्यांवर देवनागरी लिपीतील अक्षरांसोबत दोहाद येथे पाडलेल्या नाण्यांवर गुजराथी भाषेतील मजकूर देखील बघावयास मिळतो


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...