पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ
इंदोरचे होळकर घराणे - 8 ; तुकोजीराव होळकर - दुसरे
प्रशांत सुमती भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट
तत्कालीन हिंदुस्थानातील सर्वसत्ताधीश झालेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आता या राजघराण्यांवरदेखील आपला शक्तिशाली अंकुश राखून होती. राज्यासाठी वारस नेमण्यासाठीदेखील इंग्रज गव्हर्नर जनरल अथवा तत्सम उच्चाधिकारी यांची मान्यता आता महत्त्वपूर्णच नव्हे, तर अत्यावश्यक होऊन बसली होती. अशा परिस्थितीत ही राजघराणी आपला कारभार पुढे चालवत होती.
नजीकच्या कालावधीत होळकरशाहीच्या गादीवर बसलेले महाराजे हे अल्पायुषी किंवा अल्पस्वल्प कारकीर्द असलेले झाले होते. अस्थिरतेचे सावट सातत्याने आसपास भटकत होते. अशातच खंडेराव महाराज राजगादीवर बसल्यावर अवघ्या तीन महिन्यांत मृत्यू पावले होते. त्यांना कोणतेही संतान नसल्यामुळे पुनःश्च वारसाहक्काचा प्रश्न उद्भवला. इंग्रज रेसिडेंट सर रॉबर्ट हमिल्टन याने सुयोग्य वारस शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र यशवंतरावांच्या विधवा पत्नी केशरीबाई माँसाहेब यांनी अर्ज विनवण्या करून मार्तंडराव यांना पुन्हा राजगादीवर बसवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र रेसिडेंट त्यास मान्यता देईना. मग त्यांनी सरदार बापू होळकर यांचा धाकटा सुपुत्र जो या समयी 9 वर्षांचा अन् सुदृढ होता, त्यासाठी अर्जी सादर केली. रेसिडेंटने या तोडग्यास फारसे आढेवेढे न घेता होकार भरला आणि यशवंतराव सुत तुकोजीराव होळकर दुसरे यांस 27 जून 1844 रोजी दरबार भरवून ‘महाराजाधिराज राजराजेश्वर सवाई श्री तुकोजीराव होळकर’ या पदवीसह होळकरशाहीच्या सिंहासनावर बसवले. या वेळी 3 मे 1835 रोजी जन्मलेले तुकोजीराव दुसरे हे अवघ्या 9 वर्षांचे होते. रिजन्सी कौन्सिल च्या सततच्या प्रयत्नांमुळे आता वार्षिक महसूल 1845 मध्ये 22 लाखांपर्यंत पोहोचून होळकरशाहीच्या खजिन्यात पाच लाख शिलकीत पण राहिले. याचसोबत दिवाणपदी असलेल्या राजाभाऊ फणसे यांना गैरकारभाराबद्दल दूर करून रामराव पळशीकर यांना त्या पदी नेमले गेले. तसेच होळकरशाहीच्या खजिन्यातून होणारा खर्च हा तरुण महाराजा तुकोजीरावांच्या मान्यतेनेच होईल, अशी पावले उचलली गेली.
केशरीबाई माँसाहेब या इसवी सन 1849 मध्ये निधन पावल्या. आता तुकोजीराव
महाराज जातीने राज्यकारभारात लक्ष घालू लागले होते. राज्यभराचा दौरा –
भानपुरा, पाटण, कोटा, भरतपूर, आग्रा, मथुरा, हरिद्वार, दिल्ली, जयपूर,
किशनगढ, अजमेर, चितोड, रामपुरा करून तुकोजीराव 4 मार्च 1851 रोजी 5
महिन्यांनी आपल्या जहागिरीत परतले. याप्रसंगी भरवलेल्या विशेष दरबारात
महाराजांच्या आदराप्रीत्यर्थ नजराणे दिले गेले. महत्त्वाची बाब म्हणजे
सुमारे 50 वर्षांनी महेश्वर टांकसाळीचा छाप असलेले बिल्वपत्र आणि शिवलिंग
पद्धतीचे नाणेही पाडले गेले, असे उल्लेख आढळतात.
यानंतर वर्षभरातच इंग्रज रेसिडेंट हमिल्टन याने 8 मार्च 1852 रोजी कंपनी
गव्हर्नर जनरलच्या अधिकृत पत्रानुसार तुकोजीरावांना राज्याचे सर्वाधिकार
प्रदान केले. लवकरच ब्रिटिश सत्तेविरुद्ध हिंदुस्थानी स्वातंत्र्यसैनिकांनी
1857 चे सुप्रसिद्ध बंड पुकारले. मात्र यात ग्वाल्हेर संस्थानाप्रमाणेच
इंदोर नरेशांनी तटस्थ राहून एकप्रकारे इंग्रजी सत्तेसोबत सामंजस्याची
भूमिका घेतली. याबद्दल तुकोजीरावांना ब्रिटिशांनी 14 जानेवारी 1861 ला
भरवलेल्या दरबारात व्हाईसरॉय लॉर्ड कनिंगने सन्मानपूर्वक गौरविले. इसवी सन
1869 मध्ये तुकोजीरावांनी खांडवा – इंदोर या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी
तब्बल एक कोटी रुपये दिले अशी नोंद आहे. ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिने
1877 मध्ये दिल्ली येथे स्वतःसाठी समारंभपूर्वक हिंदुस्थानची सम्राज्ञी (
एािीशीी ेष खपवळर ) अशी पदवी स्वीकारली. या भव्यदिव्य समारंभाला उपस्थित
असलेल्या मोजक्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये तुकोजीराव महाराजही होते.
या वेळी त्यांना ब्रिटिश सरकारतर्फे उेरीं ेष ईाी / मानचिन्ह – राजचिन्ह –
(निशाणी) देण्यात आले. होळकरशाही अशा प्रकारे अनेक वर्षांनंतर स्थिरस्थावर
होत असताना 17 जून 1886 रोजी तुकोजीराव महाराज दुसरे हे राजवाडा महेश्वर
येथे वयाच्या 51 व्या वर्षी मरण पावले.
तुकोजीरावांच्या तब्बल बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत मल्हारनगर टांकसाळीत पाडलेली चांदीची नाणी ही मुबलक संख्येने मिळतात. तुकोजीरावांनी रुपयासोबत अर्धा रुपया, पाव रुपया तसेच 1/8 रुपया (एक अष्टमांश) ही नाणी (षीरलींळेपी) सुद्धा पाडली होती. तुकोजीरावांनी अतिशय उत्तम अशी नाण्याच्या मध्यभागी ‘मुद्रा’ ही अक्षरे असलेले चांदीचे नजराणा मुद्रा रुपये पाडलेले आहेत. यशवंतराव होळकर पहिले यांच्यानंतर संस्कृत लिखाण असलेली, शके 1780 / इसवी सन 1858 हा उल्लेख असलेली चांदीची तसेच तांब्याची नाणी (उेिशिी र्चीवीर) तुकोजीराव होळकर दुसरे यांनी पाडलेली आहेत. या चांदीच्या तसेच तांब्याच्या मुद्रा मशिनद्वारे पाडल्या असाव्यात, असा एक मतप्रवाह असण्याचे कारण म्हणजे त्या फारच सुबक, रेखीव अशा पद्धतीने पाडलेल्या होत्या. मात्र नाणी पाडण्यासाठी मशिन्स हीच मुळात 1864 मध्ये वापरात आणली गेल्याची नोंद आढळते.
तुकोजीरावांनी आपल्या कारकीर्दीत चांदीची वैविध्यपूर्ण नाणी पाडलेली
आढळतात. नाणकशास्त्राच्या परिभाषेत ज्यांना ीशाळ र्ाीवीर ीूंशि रुपये, जे
दिसायला अतिशय आकर्षक असे आहेत. त्यांवर संस्कृतमध्ये ‘श्री तुकोजी द्रस्य
जयति’ आणि श्री सांब मलार्यहल्या प्रसादतः’ असे लिहिलेले आहे. श्री सांब =
शिव (शंकर), मल्हारी = मार्तंड (सूर्य) आणि अहिल्यादेवी यांच्या
आशीर्वादेकरून तुकोजीराव महाराज यांची सदैव भरभराट होवो, असा यामागचा अर्थ
आहे. अजून जी चांदीची नजराणा पद्धतीची नाणी उपलब्ध आहेत त्यांच्यावर खांडा
तलवार आणि भाला परस्परांना छेदताना आढळतो (लीेीी ीुेीवी). यावर शकदेखील
नमूद केलेले दिसते. तसेच छानसा गंध लावलेला सूर्यदेखील छापलेला आढळतो.
यातील काही नाण्यांवर सूर्याच्या बाजूला तर काहींवर खांडा तलवारीच्या खाली
शक छापलेले आढळते. ही नाणी जरी पारंपरिक (हाती) पद्धतीने पाडलेली क्रूड
नाणी असली तरी ती अतिशय सुबक दिसतात. तांब्याची मुद्रा तसेच क्रूड पद्धतीचे
पाव आणे, अर्धा आणे अशी नाणीही तुकोजीरावांनी पाडली. यातील अर्धा आणि पाव
आण्यावर नंदी ( ीळीींंळपस र्लीश्रश्र ) तसेच शिवलिंग बघता येते. यामध्ये
नंदी आणि शिवलिंगाचे विविध प्रकारही आढळून येतात.
एकूणच तुकोजीराव महाराज दुसरे यांची विविध प्रकारची पाडलेली नाणी हेही त्यांच्या दीर्घ कारकीर्दीचं वैशिष्ट्य म्हणता येईल.
No comments:
Post a Comment