ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – भाग 8
रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठी नानी संग्राहक,लेखक, व्याख्याते | ‘नाणे’ घाट
इंग्रज राज्यकर्त्यांचे म्हणजेच व्हिक्टोरिया सम्राज्ञी आणि हिंदुस्थानातील त्यांच्या फौजांचे सामर्थ्य आणि ब्रिटिशांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढतच होते. बलशाली आणि प्रदीर्घ काळ सत्ताधीश म्हणून राहिलेले मुघल साम्राज्य आता तर त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. मात्र मराठेशाहीची ज्योत अजूनही ग्वाल्हेर संस्थानात तेवत राहिली होती.
महाराजा जनकोजीरावांचे वारस आणि आधुनिक ग्वाल्हेरचा पाया रचणारे महाराजा
जयाजीराव शिंदे यांचे इसवी सन 1886 मध्ये निधन झाले. यासमयी त्यांचे शिंदे
घराण्यात तीन पिढ्यांनंतर झालेले औरसपुत्र माधवराव तथा माधोराव महाराज हे
अवघे 10 वर्षांचे होते. माधवरावांच्या आईचे नाव गजराराणीसाहेब असे होते.
राजकुमार माधवराव यांचे राजशिक्षण ब्रिटिश
अधिकार्यांच्या कडक आणि सुनियंत्रित मार्गदर्शनाखाली झाले होते. याच
कारणामुळे कदाचित माधवराव आधुनिक ग्वाल्हेर संस्थानचे सर्वोत्तम शासक गणले
जातात आणि त्यांची राजवट ही ग्वाल्हेरचा सुवर्णकाळ मानला जातो. माधवरावांना
मोडी लिपी, संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच इत्यादी भाषा
उत्तमरीत्या अवगत होत्या. मात्र ब्रिटिश रेसिडेंटद्वारे त्या वेळी माधवराव
अल्पवयीन असल्यामुळे राज्यकारभार हाकण्यासाठी कौन्सिल ऑफ रिजन्सीची स्थापना
करण्यात आली. याच काळात 1887 मध्ये पहिल्यांदा ग्वाल्हेर नगरपालिका
स्थापण्यात आली तसेच 1912 या वर्षी प्रथमच पंचायत स्थापन करण्यात आली.
माधवराव महाराजांकडे इसवी सन 1894 मध्ये संपूर्णपणे सत्ता देण्यात आली
होती. माधवराव शिंदेंच्या कारकीर्दीत विविध उद्योग, व्यापार-उदिमांची
स्थापना झाली. अतिशय दूरदृष्टीने माधवरावांनी ग्वाल्हेर राज्याला उपयुक्त
ठरणार्या, लागणार्या वस्तू, सामग्री हे राज्यातच निर्माण होईल याकडे लक्ष
दिले. याच महत्त्वाच्या कारणामुळे राज्याची आयात करण्याची गरज कमीत कमी
होऊन निर्यात मात्र वाढली आणि ग्वाल्हेर संस्थान येणार्या प्रत्येक वर्षी
समृद्धीकडे वाटचाल करू लागले.
असे म्हणतात की महाराजसाहेब माधवराव हे दिवसातील 18 – 18 तास राज्यकारभार
व्यवस्थितरीत्या चालावा म्हणून काम करीत असत. वर उल्लेखल्यानुसार त्यांच्या
काळात ग्वाल्हेरची खूपच भरभराट झाली. त्यांनी ग्वाल्हेरात शाळा,
महाविद्यालये, रेल्वे, व्यापार केंद्रे, भाजी मार्केट, रस्तेनिर्मिती,
दवाखाने, इस्पितळ (हॉस्पिटल), शेतीच्या समृद्धीसाठी कालवे, वाहतुकीच्या
साधनांचे निर्माण व्यवस्थेकरिता लक्ष घालून, निर्मिती करून ग्वाल्हेर
संस्थान अतिशय समृद्ध बनवले.
माधवराव महाराजांनी टांकसाळींचे यांत्रिकीकरण करून त्या अत्याधुनिक बनवल्या. आवश्यकता नसलेल्या टांकसाळी त्यांनी जवळपास बंद केल्या. त्यांनी विदिशा, जावद, लष्कर, उज्जैन इत्यादी टांकसाळींत आपली नाणी पाडलेली आढळून येतात. जयाजीरावांच्या कारकीर्दीत लष्कर मिंटमध्ये आयात केलेल्या आणि आणवलेल्या यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात नाणी पाडायला सुरुवात झालेली होतीच. पण ती पैसा या मूल्याची नाणी होती. मात्र माधवरावांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर येथून सोने, चांदी, तांबे या धातूंची नाणी पाडायचा प्रयत्न केला. परंतु ब्रिटिशांनी या बाबीस जोरदार हरकत घेऊन सोन्याची तसेच चांदीची नाणी पाडण्यास आडकाठी आणायचा प्रयत्न केला; जेणेकरून त्यांचा या व्यवहारातील फायदा अबाधित राहील. अशा नोंदी आहेत की, इसवी सन 1900 च्या आसपास ब्रिटिशांनी छापलेल्या चांदीच्या रुपयांतून त्यांना 6 हजार कोटींचा वार्षिक नफा मिळत होता. माधवराव महाराजांनी विक्रम संवत 1944 म्हणजे इसवी सन 1887 मध्ये एक वेगळ्याच ढंगाचे ‘श्रीमंत माधवराव शिंदे सरकार’ असे देवनागरीत लिहिलेले तसेच सूर्य आणि सर्प चिन्हांकित तांब्याचे पाव आणा हे नाणे चलनात आणले होते. याच धर्तीवर कालांतराने अर्धा आणा हे नाणेदेखील छापून चलनात आणले होते. या नाण्यांमध्ये डाय / साचा याची व्हरायटी बघायला मिळते. मात्र ही नाणी कमी छापली गेली होती का? त्यामुळे लोकमानसात रुजली नाहीत, हे सांगणे जरा अवघड आहे. काही कारणांमुळे ही नाणी छापण्याची प्रक्रिया मात्र थांबवण्यात आली, अशा नोंदी आहेत. पण काहीही असले तरी ही नाणी फारच अल्प प्रमाणात आता उपलब्ध आहेत.
यानंतरच्या नाण्यांमधील मोठा बदल बघावयास मिळतो तो म्हणजे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी – उदाहरणार्थ विल्यम चौथा, व्हिक्टोरिया तरुणपणातील चेहरा ( young bust), राणी असताना (Queen), आणि सम्राज्ञी (Empress) असतानाची छबी / प्रतिमा / फोटो जसा छापला होता तसाच स्वतःचा फोटो/चेहरा माधवराव महाराजांनी प्रथमतःच नाण्यांवर छापला होता. यावर मराठेशाहीची निशाणी असलेली शिंदेशाही पगडी घातलेला चेहरा तसेच आलिजाबहाद्दर हा किताबदेखील छापलेला बघावयास मिळतो. याचेच अनुकरण करीत पुढे त्यांचे वारस सुपुत्र जिवाजीराव शिंदे महाराजांनी पण छापलेले आढळते. ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये ही व्हिक्टोरियानंतर किंग एडवर्ड सातवा (केईएम हॉस्पिटलचे नाव – किंग एडवर्ड मेमोरियल), जॉर्ज पाचवा आणि जॉर्ज सहावा यांनी आपापल्या प्रतिमाही अंकित केल्या होत्या. माधवराव महाराजांनी स्वतःची प्रतिमा असलेल्या सोन्याच्या मोहरादेखील पाडल्या होत्या. तसेच चांदीचा रिीींंशीप रुपयादेखील छापला होता. माधवरावांच्या चांदीच्या रुपयांवर तसेच तांब्याच्या नाण्यांवर धनुष्यबाण, तलवार, त्रिशूळ, नाग / सर्प, भाला, ग्वाल्हेर संस्थानचा मोनोग्राम किंवा रॉयल एम्ब्लेम तसेच मा हे आद्याक्षरदेखील छापलेले आढळते. ग्वाल्हेरच्या या सर्वोत्तम शासकाचे निधन मात्र ते विदेश दौर्यावर असताना इसवी सन 1925 मध्ये फ्रान्स ची राजधानी परिस या शहरात झाले.
– प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
(मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते )
No comments:
Post a Comment