विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 December 2022

मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न " नाना साहेब पेशव्यांनी आंग्रेंचे आरमार का बुडविले? " भाग २

 


मराठा इतिहासात मधील सर्वात अवघड प्रश्न " नाना साहेब पेशव्यांनी आंग्रेंचे आरमार का बुडविले? " भाग २

लेखन :आशिष माळी
पराक्रमी तुळाजी आंग्रे
संभाजी सन १७४२ साली मरण पावल्यावर त्यांचे बंधू तुळाजी ‘सरखेल’ झाले (सन १७४२-१७५६).तुळाजी हे आपल्या कान्होजी सारखे पराक्रमी होते. त्यांनी सिद्दीच्या प्रदेशावर आक्रमण करून त्याचे गोवळकोट आणि अंजनवेल हे किल्ले जिंकले. त्यांनी इंग्रजांच्या जहाजांना आपले परवाने घ्यावयास लावले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांचा सर्वत्र दरारा निर्माण झाला.
तुळाजींनी इंग्रजांची खालील बलाढ्य जहाजे बुडविली.
1. Charlotte of Madras,
2.William of Bombay
3. Svern of Bengal
4.Darby,
5. Restoration
6. Pilot
7. Augusta
8. Dadabhoi of Surat
एका इंग्रज अधिकाऱ्याने तुळाजींचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, "तुळाजी रंगाने निमगोरे, उंच आणि रूबाबदार होते. त्यांना पाहिल्यावर त्यांच्या मूर्तिमंत शौर्याची कल्पना येते. त्यांची कृतीही त्यांच्या रूपास साजेसी आहे. कोणतेही जहाज त्यांच्या तावडीत सापडले की, ते सहसा सुटून जात नसे. इंग्रज व्यापाऱ्यांनी त्यांचा इतका धसका घेतला होता की, देवापासी ते तुळाजीस पकडून आमच्या ताब्यात आणून दे असा धावा करीत असे.तुळाजींची शक्ती आणि तयारी कायम परिपूर्ण असे. त्यांची बंदरे भरभराठींत असून रयत सुखी आहे. तीस हजार फौज त्यांच्यापाशी असून त्यांची तयारी नेहमी जय्यत असे. त्यांच्या तोफखान्यावर अनेक कुशल युरोपीय लोक, लष्करी आणि आरमारी कामे झटून करीत होते. त्यांच्या आरमारात साठांवर अधिक जहाजे आहेत शिवाय हत्ती, दारूगोळा व शस्त्रास्त्रे असंख्य आहेत."[1]
जे लोक नानासाहेबांनी आरमार बुडवले त्यांचे मत असे
  1. तुळाजी आंग्रे आणि नानासाहेब मध्ये संघर्ष सुरू झाला. दोघेही पराक्रम आणि त्यांचे वडील तर महापराक्रमी. त्यावेळी सांभाळून घेणारे शाहू महाराज 1749 मध्ये मृत्यू झाले आणि पुढे नाममात्र मराठा राजा रामराजे सत्तेवर आले.तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती(?). त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह च फायदा घेऊन मानाजी ल आपल्याकडे वळवले.. नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. सन १७५६साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या ताब्यात आले.त्यांना पेशव्यांनी वंदन किल्ल्यावर कैदेत ठेवले.सुमारे तीस वर्ष ते पेशव्यांच्या कैदेत होते.कैदेतच त्यांचे निधन झाले. ज्यांच्या नावाने शत्रू घाबरायचे, तत्यांचा वापर मुत्सद्दी पणाने झाला नाही कारण पहिला बाजीराव किंवा शाहू महाराज त्यावेळी नव्हते..?
  2. काहींच्या मते नानासाहेब पेशव्यांची ही चूक भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घोडचूक म्हणता येईल. कारण यामुळे इंग्रजांना पश्चिम किनारा आपल्या साम्राज्यविस्तारासाठी खुला झाला आणि त्यांचे भारतातील पाय अधिक घट्ट झाले. मराठ्यांचे बलाढ्य आरमार नष्ट झाले नसते तर इंग्रजांची सत्ता भारतात कधीच प्रस्थापित झाली नसती. अडमिरल वॅटसनच्या विजयदुर्गावरील विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात शिरकाव झाला त्यामुळे त्याच्या निधनानंतर त्याचे स्मारक ईस्ट इंडिया कंपनीने Westminster abbey (इंग्लंड) या ठिकाणी बांधले आहे.त्याची समाधी कोलकत्ता येथे आहे.
  3. रियासातकर यांचे एक नानासाहेबांचे पत्र प्रसिद्ध केले त्यात नाना साहेब इंग्रजांना लिहतात की आरमार च सर्व कारभार इंग्रजांनी बघावा. आता हे आमिष होते की मनापासून लिहला हे नानासाहेबांना माहित, आपण फक्त तर्क करू शकतो.
  4. पेशवे इंग्रज करार मधील खालील अटी पाहा . हा करार 1755 मध्ये झाला. (१) सर्व आरमार इंग्रजांचे ताब्यात असावे पण कारभार मात्र उभयतांच्या समतीने व्हावा.(२)आंग्रे चे आरमार पेशवे आणि इंग्रजांनी निम्मे निम्मे वाटून घ्यावे.(३)बाणकोट आणि हीमतगड मधील 5 गावे मराठ्यांनी इंग्रजांना द्यावी.

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....