विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 25 January 2023

बहादूरशहा जफर कि कहाणी भाग २

 

बहादूरशहा जफर कि कहाणी
लेखन ::आशिष माळी


भाग २
बहादुरशहा च्या काही मुलं पैकी दोन्ही मुलांना इंग्रजनी मारून टाकले.त्याच्या अनेक राजकुमारीना फाटक्या कपड्यांच्या बरोबर दिल्लीच्या रस्त्यावरून कैद करून नेले.कॅप्टन हडसन ने बहादूर जफर आणि त्याच्या काही मुलांना शरण यायला सांगितले।बहादूर जफर हा हुमायून च्या कबरी मध्ये लपला .पण बहादूर जफर ची दोन मुले मिर्ज़ा मुग़ल झहीर उद्दीन , मिर्जा खज्र सुल्तान बहादूर , आणि एक नातू मिर्जा अबू बकर हे दुसरीकडे लपले.कॅप्टन हडसन ने त्या तिघांना पकडले.त्यांच्या अंगावरची कपडे काढून तिघांना ठार मारले.ज्या दरवाजा जवळ मारले त्या दरवाजाला आज सुद्धा पुराणी दिल्ली मध्ये खुनी दरवाजा म्हणून ओळखतात.
त्याच्यावर खटला लाल किल्ला ला चालवण्यात आला.ऑक्टोम्बर १८५८:त्याला आणि राजघरानंतल्या लोकांना बंदिस्त करून रंगून ला पाठवले.कॅप्टन नेल्सन davis ने त्यांना आणले.आता त्यांना जेल मध्ये ठेवण्यापेक्षा नेल्सन ने त्याला आवल्या घरातल्या गैरेंज मध्ये ठेवले.ज्या मुघली लोकांची सत्ता अफगाण ते म्यानमार पर्यंत होती त्याला पाच वर्षे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गैरेंज मध्ये राहायला लागले.त्याचे कुटुंब पण हळू हळू रंगून मध्ये पांगले.आता त्याला एक नोकर अधून मधून पाहायचा.अनेक दिवसानंतर एक आवाज आला.बादशाह चा नोकर ने नेल्सन ला बोलावले.गैरेंज मध्ये घेऊन गेला.मिणमिणत्या दिव्यामध्ये नेलसीं ने पाहिले ते लिहून ठेवले आहे की ९५ वर्षाचा हिंदुस्थान बादशाह मारून पडला आणि काही दिवस पूर्वी मृत्यू झाला असल्यामुळे दुर्गंधी झाली होती आणि त्याने पर्यंत जेवढे चेहरे पाहिले त्यात सर्वात भिकारीसारखा चेहरा त्याचा होता .त्याने त्याच्या दोन मुलांना शहजादा मिर्झा जवान बखत आणि शहजादा इब्राहिम देहलवी ला बोलावले.कशीबशी दफनाला जागा मिळवली.
त्या तिघांचा शेवटचा फोटो
रंगून मध्ये मात्र त्याचा खूप हलाखीत मृत्यू झाला

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...