हिंदुस्तानातील इतिहासातील सर्व " शिंदे घराणे "
यांचा इतिहास
लेख :: हनुमंत शिंदे सरकार
काही इतिहासकारांच्या मते कर्नाटक मध्ये जो सेंद्रक वंश होता.राजस्थानथे साधारण इसवी ३०० ते ४०० मध्ये नागवंशाच राज्य होऊन गेले,राजस्थान, रणथंब ही शिंद्यांची राजधानी सांगितली जाते तर बदामी सुद्धा सांगितली जाते,चालुक्य काळात पुन्हा हे घराणे भरभराटीस आले,यदवांशी काही काळ लढाया झाले तर कदम-कदंब – चालुक्य अश्या राजघराण्यांशी संबंध होते.आज ही शिंद्यांच्या देव्हार्यात नागाची आणि श्रीसूर्याची पूजा अर्चना मोठ्या मनीभावाने केली जाते.! सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव प्राप्त झाले.
सेंद्रक हे अगदी पूरातन काळापासून व सर्वशृत असे मध्यभारत कालीन घराणे आहे. ते मुळच सिंध पंजाब प्रांताचे राजे होते. पुढे तापीच्या दक्षिणतिरी खानदेशी वसाहती केल्या. सेंद्रक घराण्यातील भिल्लशक्ती व जयशक्ती यांचे पूर्वकालीन ताम्रपट आजतागायत त्यांच्या स्मृती करीत आहेत. शिंध्यांच्या कुळस्वामी कोल्हापूरजवळ ज्योतिबा वाडी येथे असून रत्नागिरीस देऊळ आहे. त्याची प्रत्येक चैत्र्यात जत्रा भरते.
सेंद्रक घराण्यात,ताथवडाकर शिंदे, दसपटीचे शिंदे, कुडाळकर शिंदे, तोरगळकर शिंदे,नेसरीकर शिंदे, घेडवाडकर शिंदे,कण्हेरखेडकर शिंदे,म्हैसाळकर शिंदे, मळणगावकर शिंदे,पिंगोरकर शिंदे, धारवाडकर शिंदे सरकार ही घराणी उदयास आली.
कण्हेरखेडचे पाटील जनकोजी राव शिंदे होते ते राणोजीराव शिंदे यांचे वडील तर शिवशाहीत नेसरीकर घराणे होते,वेडात मराठे वीर दौडले सात या नेसरीतीळ लढाईत प्रतापराव गुजर यांच्यात सोबत विठोजी शिंदे हे सरदार होते, विठोजीराव शिंदे हे शेद्रे बेंद्रे सातारा या गावचे, शाहू छत्रपती यांच्या पहिली पत्नी अंबिकाबाई या शिंदे घराण्यातील, सतराव्या शतकात राणोजीरावांच्या पासून शिंद्यांची जी घोड दोड सुरू झाली ती शेवट १८१८पर्यंत म्हणजे एक शतक चालली.
मराठ्यांच्या प्रत्येक रणसंग्रामत शिंदे घराणे हे अग्रगण्य होते, शिव पूर्व काळात शिंद्यांची घराणी, चालुक्य राष्ट्रकूट,बहामनी, व नंतर आदिलशाही या काळात सुद्धा आपला दरारा कायम राखून होती, रुस्तमराव, झुजारराव,रविराव हे मानाचे किताब या घराण्याकडे होते, सह्याद्रीच्या रांगेतील ताथवडा या किल्ल्याची किल्लेदारी, पुरंदर, धारवाड चंदगड, तोरगल,तिकोना किल्ल्याची किल्लेदारी या घराण्याकडे होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या लढ्यात हे घराणं सक्रिय झाले, यात काळोजी शिंदे ताथवडा, फुलाजी शिंदे तिकोना, विठोजी,यमाजी,महिमाजी शिंदे,बाजीराव शिंदे तानाजीराव शिंदे असे अनेक शूर सेनानी होऊन गेले.
No comments:
Post a Comment