विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 March 2023

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. श्रीमंत बाजीराव पेशवे भाग २०

 


मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग २०
या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे व तो म्हणजे आरमारी आणि मैदानी युद्धातील फरक ! मैदानी लढायांचा निकाल चार - दोन चकमकींमध्ये देखील निर्णायकपणे लागेलचं असे नाही. परंतु, आरमारी युद्धांत एका लहानशा चकमकीतील पराभव देखील निर्णायक ठरू शकतो. जंजिरेकरांशी लढताना आपल्या आरमाराचे अधिक नुकसान होऊ नये याची काळजी आंगऱ्यांना घेणे भाग होते. कारण याच आरमाराच्या बळावर त्यांना देशी - विदेशी शत्रूंना तोंड द्यायचे होते. या ठिकाणी फक्त एवढेचं सांगतो कि, आपली सर्व लढाई शक्ती एकवटून एखाद्या आरमारी लढाईत उतरण्यास जिथे पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धातील प्रगत देशांचे आरमारप्रमुख देखील धजावले नाहीत, तिथे अठराव्या शतकातील आंगऱ्यांनी थोडाफार बोटचेपेपणा केला तर त्यात त्यांना दोष का द्यावा ?
स. १७३३ च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीसोबत तह करून बाजीरावाने जंजिरा प्रकरणातून साफ माघार घेतली. पुढे चिमाजीआपाने आंगऱ्यांच्या मदतीने सिद्द्यांना शरण येण्यास भाग पाडले पण तो भाग प्रस्तुत विषयाच्या चौकटीत बसत नसल्याने त्याची माहिती येथे देत नाही.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...