विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 17 March 2023

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. श्रीमंत बाजीराव पेशवे भाग १८

 


मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १८
डभईच्या लढाईनंतर स्वतः शाहूने तळेगावी जाउन त्रिंबकरावाची आई -- उमाबाई -- हिची भेट घेऊन तिचे सांत्वन केले. पेशवे - सेनापती यांच्यात दिलजमाई घडून यावी यासाठी प्रयत्न केले पण दाभाड्यांनी मनातील तेढ सोडली नाही. त्याशिवाय त्यांच्या घरातही लवकरचं अव्यवस्था माजून सेनापतीपद मात्र त्यांच्याकडे राहून गुजरातचा कारभार पुढे त्यांचा सरदार गायकवाड, याच्या हाती गेला.
डभई प्रसंगाची जरा जास्त तपशीलवार चर्चा करण्याचे कारण म्हणजे या लढाईनंतर शाहूच्या उर्वरीत प्रधानांवर आणि इतर मराठी सरदारांवर पेशव्याची जरब बसली. पेशव्याच्या विरुद्ध जाणाऱ्याची आपण कशी वाट लावू शकतो हेच या प्रसंगातून पेशवेबंधूंनी आपल्या विरोधकांना दाखवून दिले. याच ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करणे आवश्यक वाटते कि, दाभाड्यांनी निजामाचा आश्रय घेतल्यामुळे सातारकर छत्रपतींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पेशव्याला हे कटू कर्तव्य पार पाडावे लागले असे इतिहासकार सांगतात. परंतु दाभाडे, आंग्रे, भोसले इ. प्रकरणांतील पेशव्यांचे वर्तन पाहता वरवर आपण छत्रपतीचे हित साधत आहोत असे दाखवून पेशवे आपल्या डोईजड प्रतिस्पर्ध्यांना संपवत वा दुबळे करत चालले होते. छत्रपतीला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असताना हि स्थिती होती तर मग पेशवाईत जेव्हा छत्रपती नामधारी झाले त्यावेळची स्थिती काय वर्णावी ?

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...