----------------------------------------------
कदम
घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठा नावलौकिक मिळवला.महाराष्ट्रात
कदम घराण्याचा अनेक शाखा आहेत.त्यापैकी फलटण तालुक्यातील गिरवीच्या कदम
घराण्याची शाखा इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहे.
गिरवी
गावी या कदम घराण्याच्या गढी-वाड्यांचे अवशेष आपल्याला पहायला मिळतात.या
वाड्यांची भव्यता पाहुन आपल्याला कदम घराण्याच्या त्याकाळी असणाऱ्या
वैभवाची,ऐश्वर्याची प्रचिती येते.
सवाई
माधवराव पेशवा यांच्या रोजनिशीमध्ये सरदार कदम यांच्या आपल्या गिरवी
गावच्या पाटीलकीच्या वडीलपणा संबंधी १७७४-७५ सालाचे एक निवाडापत्र आहे.या
निवाडापत्राद्वारे अशी माहिती मिळते की,बहिरजी बिन द्वारकोजी बिन कृष्णाजी
पाटील कदम मोकादम व आप्पाजीराव बिन भगवंतराव बिन कृष्णाजी पाटील कदम
यांच्याकडे वडीलकीचा मान होता.
१७६४
साली गिरवी गावच्या पाटीलकीच्या वडीलपणा संबंधी भावकीत थोडे वाद होते
त्याचा निवाडा मुधोजी नाईक निंबाळकर,फलटण परगण्याच्या देशपांडे यांनी
दफ्तरी असणारी जुनी कागदपत्रे पाहून व गिरवी गावच्या बारा बलुतेदारांची
साक्ष घेऊन केला.यामध्ये द्वारकोजी बिन कृष्णाजी कदम पाटील यांचा वडीलपणा
सिद्ध झाला व भिकाजी बिन सुभानजी कदम पाटील व सखोजी बिन द्वारकोजी कदम
पाटील यांनी धाकटेपणाने राहून निमे मोकादम करावे असा निवाडा झाला.
पुढे
काही वर्षे सुरळीत चालु होते परंतु भिकाजी पाटील कदम यांच्या घरातील
आनंदराव कदम म्हणून एक घरभाऊ हुजूर चाकरीस होता त्यांनी थोरल्या घरातील
बहिरजी पाटील कदम यांचा भाऊ संताजी पाटील कदम यांना काही कागदपत्रे व मौजे
विडणी गावासंबंधी झालेला मजहर दाखवुन वडीलपणासंबंधी दावा केला.
थोड्या
काळाकरता भिकाजी पाटील कदम यांच्या वडिलांनी पाटीलकीचा कारभार केला
होता.त्यामुळे काही मजहर,कागदपत्रांवर त्यांचे नाव मोकादम म्हणून
होते.परंतु जुनी मोकादमी बहिरजी पाटील कदम यांच्या घराची सांगून मुधोजी
नाईक निंबाळकर यांनी करून दिलेल्या मजहराप्रमाणे निकाल देण्यात आला.
निवाडापत्रात
उल्लेख असलेले"भगवंतराव कृष्णाजी पाटील कदम"गिरवीकर हे शिंदे सरकारांच्या
सोबत राहून उत्तरेत मराठा साम्राज्याची सेवा करीत होते.शिंदे सरकार यांच्या
पदरी राहुन गिरवीकर कदम घराण्याने बराच पराक्रम गाजविला.सरदार भगवानराव
कदम यांनी उत्तरेत अनेक लढायांमध्ये भाग घेऊन महत्वपूर्ण कामगिरी
बजावली.सरदार भगवानराव कदम यांना आप्पाजीराव कदम आणि मानाजीराव कदम हि दोन
मुले होती.आप्पाजीराव व मानाजीराव यांनी आपल्या वडिलांना प्रत्येक मोहिमेत
मोलाची साथ दिली.
सरदार
भगवानराव कदम यांच्यानंतर आप्पाजीराव कदम यांनी आपल्या घराण्याचा
पराक्रमाचा वारसा अविरतपणे चालु ठेवला.शिंदे सरकारांनी या गिरवीकर कदम
घराण्याला हत्ती,पालखी देऊन मोठा मानसन्मान केला.त्यामुळे गिरवीकर कदम
घराण्याला ग्वाल्हेरमध्ये "हत्तीवाले कदम"म्हणुन ओळख आहे.या प्रमाणे
गिरवीकर कदम यांची माहिती मिळते.
----------------------------------------------
©प्रसाद शिंदे
•फोटो साभार-शेखर शिंदे
No comments:
Post a Comment