विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

मराठे आणि दिल्लीचा इतिहास भाग ३

 

मराठे आणि दिल्लीचा इतिहास
लेखन :आशिष माळी


भाग ३
चौथी संधी आली ती १७५९ मध्ये
  • गाझीउद्दीन जो वजीर होता त्याने आलमगीर दूसरा याचा खून केला. आलमगीर दूसरा चा चिरंजीव अली गौहर बिहार पळून गेला. त्याने सदाशिव भाऊ पेशव्याची मदत मागितली. सदाशिवभाऊंनी दिल्लीवर चाल केली शहा जहान तिसरा याला हाकलवाले आणि अली गौहरला शाह आलम दूसरा नावाने मुघल सम्राट म्हणून सिंहासनावर बसवले. शाह आलम दूसरा नावापूरताच सम्राट होता. कारण दिल्लीची बादशाही खराब झालेली होती . सदाशिवभाऊंना दिल्ली तख्त जिंकणे अगदीच सोपे होते पण ती इच्छाच त्यांच्या ठायी नव्हती कारण त्या वेळी नजीब आणि दुर्रानी भारताच्या उरावर बसले होते . १७६१ मध्ये पानीपतची युद्ध झाले मराठेशाहीवर कोसळली. त्यात सदाशिवभाऊ गेले. शाह आलम दूसरा याने राज्यविस्तारासाठी बंगालकडे मोर्चा वळवला. पण १७६४ साली बक्सारच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्ह विरूद्ध त्याचा पराभव झाला. कंपनीने त्याला दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घातली.
सदाशिव भाऊ पेशवे
पाचवी संधी आली महादजी शिंदे यांना
  • बक्सारच्या पराभवानंतर शाहआलम दूसरा वणवण फिरत होता.१७७२ मध्ये महादजी शिंदेनी शाह आलम दूसरा ह्यास पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसवले. पण मराठ्यांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतले नाही . दरम्यान महादजी रजपूतांशी भांडणात व्यस्त असताना पानीपतातला नजीब उदौला ह्याचा नातू गुलाम कादीर हा रोहिलाखंडचा नवाब सरळ दिल्लीत घुसला. त्याने शहा आलम दूसरा कडून जबरदस्तीने वझीर पदाचे अधिकार घेतले. शाह आलम दूसरा याचा भित्रेपणा जाणून त्याने लाल किल्ल्यातील सम्राटाच्या जनानखान्यातील स्त्रीयांवर बलात्कार केले. अब्रू लुटल्या आणि खजिना ही लुटला. शाह आलमचे डोळे काढले; दाढी सोलून काढली. महादजी शिंदे पर्यंत वार्ता जाईपोवेतो दहा आठवडे लोटले. शेवटी महादजीनेच गुलाम कादीर ह्या ला संपवले
  • पुन्हा असे काही घडू नये म्हणून १७८८ पासून पुढे वीस वर्ष मराठ्यांची फौज लालकिल्ल्याचे रक्षण करण्यासाठी दिल्लीत राहिली मराठे मुघलांचे संरक्षक झाले पण सिंहासनाधिपती किंवा दिल्लीच्या आसनावर बसले नाही .
  • १८०३ च्या दूसऱ्या इंग्रज-मराठे युध्दात मराठ्यांनी दिल्लीचा ताबा गमावला.
पुढे मराठ्यांचे नाव दूसरा बाजीराव पेशवा झाला . यशवंतराव होळकर मराठ्यांच्या सारख्या महान सरदाराला बाजूला ठेवले . पण शिंदे-होळकर-पेशवे आपापसात भांडत राहिले. या तिघांच्या भांडणात दिल्ली तर सोडा आहे ते स्वराज्य लयाला गेले . यशवंतरावांमध्ये ब्रिटीशांना दिल्लीतून हुसकावून लावण्याची हिम्मत आणि इच्छा होतो लॉर्ड वेलेस्ली ज्याने पुढे जाऊन वॉटर्लू युद्धात नेपोलियनचा पराभव केला, त्याने यशवंतरावां पुढे हार मनाली होतो . यशवंतरावाने इंग्रजांविरूद्ध रजपूत, रोहिला ,शिख , मराठा ,जाट एकत्र करण्याचा प्रयत्न केला. यशवंतरावांना दिल्ली ब्रिटीशांच्या ताब्यातून सोडवायची होती. पंजाबचे महाराजा रणजितसिंह मदतीला तयार ही झाले पण चाणाक्ष इंग्रजांनी बेत हाणून पाडला. शिंदे-होळकर-पेशव्यांत मनोमिलन घडवणारे द्रष्टा नेता दुर्दैवाने कुणी नव्हते.महादजी शिंदे
तळतीप

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...