विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

मराठे आणि दिल्लीचा इतिहास भाग २

 

मराठे आणि दिल्लीचा इतिहास
लेखन :आशिष माळी


भाग २
मराठ्यांना दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याची दूसरी संधी आली होती ती मार्च,१७३७ मध्ये
मार्चच्या अखेरीस थोरल्या बाजीरावाने थेट दिल्लीवर आक्रमण केली. मराठा फौजा दिल्लीच्या बारापूला व काल्काच्या देवळापर्यंत धडकल्या. मुहम्मद शाह सम्राटाची पाचावर धारण बसली. दिल्लीच्या रकाबगंज भागात मुघलांच्या १०००० सैनिकांच्या पराभव केला. बाजीरावाने नंतर तालकटोरा मैदाने कडे आक्रम केले पण तिथे कमरूद्दीन खान चालून आला पण बाजीरावाने त्याचा पराभव केला . बाजीरावाचा दिल्ली जाळण्याचा इरादा होता शाहू महाराजांचे शब्द आठवून सर्व बेत रद्द केला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राटाने ओलीस ठेवलेल्या शाहूची व आई येसूबाईची सन्मानपूर्वक सुटका केली होती.
पाहिले बाजीराव
तिसरी संधी आली होती ती १७५७ साली.
त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर आलमगीर दूसरा हा पळपुटा मुघल सम्राट राज्य करीत होता. अहमदशाह अब्दालीच्या दुसऱ्या स्वारीनंतर नजीब हा अतिशय लबाड प्रवृत्तीचा गोडबोल्या रोहिलाच खऱ्या अर्थाने राज्यकारभार पाहत होता. त्यामुळे इमाद ह्या मुघलांच्या वझीराने रघुनाथरावांशी संधान बांधले. मल्हारराव होळकर सखाराम बापूंनी नि थोर पराक्रम केला . रघूनाथरावांनी लाहोर गेटच्या दिशेने आक्रमण केले तर विठ्ठल सदाशिव यांनी काश्मीरी गेट पडला ; मानाजी पायगुडेंनी काबूलगेटच्या बाजूनी हल्ला केला . चारी बाजूनी मराठ्यांनी लाल किल्ला वेढल्याने नजीब घाबरला आणि वकिल मेघराज मल्हाररावांकडे पाठवून तहाची बोलणी करण्यात वेळ काढूपणा केला. मल्हारराव ने नजीब ला मानस पुत्र मानले होते . रघूनाथरावांचा धीर सुटला. त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दिल्ली वर स्वारी केली. नजीबने हातपाय पडून अखेर रघूनाथरावांना टाळून मल्हाररावांशी तह केला. त्यांनी लाल किल्ला जिंकला मराठ्यांना यावेळी ही दिल्लीच्या तख्तामध्ये रस नव्हता.दोघांनी पंजाब प्रांतात राज्यविस्तार करण्याकडे मोर्चा बांधला.(याच नजीब ने पुन्हा मराठ्यांशी गद्दारी केली आणि पानिपत झाले ) त्यामुळे बहलोल खानाला जिवंत सोडल्याबद्दल शिवाजी महाराजांनी का पत्र लिहले याचे महत्व कळते.
रघुनाथ पेशवे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...