तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
नजीब आणि
काही स्थानिक धर्मांधांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन अहमदशहाने
हिंदुस्थानवर पुन्हा एकदा आक्रमण केले. या आक्रमणाची खबर पुणे दरबारी पोचली
व रक्षणासाठी त्वरा करण्याचा बादशाही खलितासुद्धा आला. मात्र या वेळी
नानासाहेब पेशव्यांनी राघोबादादाऐवजी सदाशिवरावभाऊ या चिमाजीअप्पाच्या
चिरंजीवाकडे सेनेचे आधिपत्य देण्याचा निर्णय घेतला. भाऊने नुकतीच उदगीरच्या
लढाईत निजामाला धूळ चारली होती व राघोबाच्या मोहिमेत पेशव्यांचा काही
फायदा न होता दौलतीच्या कर्जात मात्र भर पडली असल्याने भाऊची नियुक्ती
स्वाभाविकच म्हणावी लागते. भाऊबरोबर नानासाहेबांचा थोरला मुलगा विश्वासरावही मोहिमेवर जाईल असे ठरले.
No comments:
Post a Comment