हणगोजी चव्हाणहंबीररावमोहिते महाराजा शहाजीराजे भोसले यांचे सासरे व राणीसरकार तुकाबाईसाहेब मोहिते यांचे पिताश्री .
पोस्तसांभार :;धीरजराजे हंबीरराव
सदरील संदर्भ हा "शाहजँहा के हिंदु मनसबदार" या ऐतिहासिक ग्रंथातील असुन त्याचे सम्पादक मनोहरसिंहजी राणावत आहे, मुळ फारसी काखदपत्रांतुन हिंदु मनसबदारांच्या नोंदींचे हे संकलण केलेले आहे . यात विविध श्रेणीची मनसबदारांची नावे दिलेली आहेत . हणगोजी मोहिते हे (अ)श्रेणीचे मनसबदार असुन त्यांच्यासंदर्भातील मजकुराचा मायना ग्रंथात दिलेला आहे . सदरील ग्रंथाची नक्कल Rajenaresh Jadhavrao यांच्याकडून जाधवरावांच्या आडगावराजा शाखेतील राजेभागवत मानसिंगराव जाधवराव आमचे आजोबा यांच्याकडून मला प्राप्त झालेली आहे . यात हणगोजी मोहिते यांचा एक मुलगा संभाजी बाजीमोहिते असल्याचे संदर्भ उपलबध आहे व त्या संभाजी बाजीमोहित्यांना तळबीडची देशमुखी हि शहाजीराजेंनी दिल्याच्या नोंदीही उपलब्ध आहे . त्याव्यतिरिक्त संभाजी बाजी मोहिते यांस पोगरवाडी पुणे येथील वास्तव्यास असल्याच्याही नोंदी मिळतात. हणगोजी मोहिते यांना अजुन मुले असल्याच्या नोंदी पहावयास मिळतात त्याचेही सविस्तर लेख लवकरच देऊ . भातवडीच्या लढाईत लढणारे "चव्हाणहंबीरराव" हे बाजीमोहिते घराण्यातील संभाजीबाजी मोहिते यांचे वडिल हणगोजी मोहिते होते एवढे निश्चित.
No comments:
Post a Comment