ग.ह खरे याच्या ऐतिहासिक फारसी साहित्य खंड-2 मधील मोहिते प्रकर्णातील शेवटची दोन फर्माणे खुप महत्वाची आहे . ज्यातुन चव्हाणहंबीररावमोहिते घराण्यातील पितापुत्र यांचा उल्लेख आलेला आहे. मुघल बादशाह औरंगजेब याने पाठवलेल्या फर्मानात असा उल्लेख आहे कि एल्होजी मोहितेंनी आमच्या कानावर घातलेले आहे कि परगणे धारबार सुभे वर्हाड याची देशमुखी बादशाही फर्मानाप्रमाणे त्याचा बाप भिकुजी चौहाण याजकडे मुकर्रर होती .यात मुलाच्या नावापुढे मोहिते व वडिलांच्या नावापुढे चौहाण असा उल्लेख स्वतः औरंगजेबाने फर्माणात केलेला आहे यावरून मोहिते उर्फ चव्हाण लावण्याची परपंरा हि पुढच्या पिढीतही चालूच होती .
शिवाय औरंगजेबाने एल्होजी मोहितेंच्या हाताखाली असलेल्या अधिकार्यांना ताकिद दिलेलि आहे . हे फर्माणात साल दिलेले नसुन हे भिकुजींच्या शेवटच्या फर्माणानुसार इ .स 1690 नंतरचे असावे एवढे मात्र निश्चित होते. भिकुजींना निश्चित एल्होजी शिवाय गोरखोजीराव नावाचा मुलगा होता व त्यानंतरच्या मुलांच्या नोंदी ह्या सापडत नाहि परंतु अहमदनगर जिलह्यातील नेवासकर मोहिते व रत्नागिरी येथील किंजळकर मोहिते घराण्यातील मुळ पुरूषांत भिकुजींचे नाव येत असुन विठोजी मोहिते नेवासकर व शिवाजी मोहिते किंजळकर असे संदर्भ सापडतात .भिकुजी मोहिते हे लखुजीराव व भुतोजीराजे जाधवराव , शहाजीराजे ,शरीफजीराजे,संभाजीराजे,मालोजीराजे दुसरे,हणगोजी मोहिते यांना समकालीन होते एवढे भिकुजी फर्माणाच्या सालांवरून निश्चित होते.
No comments:
Post a Comment