विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 May 2023

चव्हाणहंबीररावमोहिते घराणे 🚩 भिकुजी प्रथम

 

चव्हाणहंबीररावमोहिते घराणे 
भिकुजी प्रथम
 पोस्तसांभार :;धीरजराजे हंबीरराव



"चव्हाणहंबीररावमोहिते" घराण्यातील एक महत्त्वाचे पराक्रमी पुरुष 'भिकुजीमोहिते' यांच्या संदर्भातील अनेक ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहे त्यांच्या जहागिरीच्या, मनसबदारीच्या व नातेसंबंधांच्या तसेच मुलांच्या नोंदी इतिहासात विविध ठिकाणी पहावयास मिळतात. सदरील लेख ऐतिहासिक फारसी साहित्य खंड-2 भारत इतिहास संशोधन मंडळ त्रैमासिकाच्या वर्ष 15,16,18 अंकातील आहे, ह्या फारशी कागदपत्रांचे मराठी अनुवाद ग.ह.खरे यांनी केलेले आहे या खंडाचे प्रकाशन साल.इ.स 1937 आहे.
तारीख 13 जून 1630 शके1552 अधिक आषाढ शुद्ध चतुर्दशी सदरील फर्मान शहाजानबादशाह गादीवर असताना व त्याचा मुलगा औरंगजेब दक्षिणेत सुभेदार असताना "भिकुजीचव्हाण" ह्या नावाने मुघल दरबारातून फर्माने सुटलेली आहे. त्यातील मजकूर पूर्ण फारशी असून त्याचा मायना पुढील प्रमाणे आहे.
धारबारगीर ची देशमुखी "भिकुजीचव्हाण" यांजकडे असावी . 19 व्या शतकात बऱ्याच अभ्यासकांनी फारसी कागदपत्रांमध्ये येणारा 'खिदमत' हा शब्द चाकरी या अर्थाने घेतलेला आहे; ज्याप्रकारे आज राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा त्यास आपण राज्यसेवा परीक्षा असे म्हणतो अगदी त्याचप्रमाणे पूर्वी शाही सल्तनतीमध्ये 'खिदमत' ह्या शब्दाचा अर्थ दौलतीची सेवा येथे दौलत म्हणजे ज्यापदावर आहे त्यापदाची सेवा असा अर्थ होतो. खुर्द बादशहा गादीवर असताना त्याचा मुलगा जरी सुभेदार असला तरी देखील त्यासही जी दौलत अर्थात जे पद दिलेले असायचे त्या संदर्भातील सुटलेले फर्मानात त्यासही 'खिदमत' हा शब्द सामान्यपणे आलेला दिसतो. फारसी शब्दांचे हिंदी अथवा मराठी अनुवाद होत असताना बऱ्याच अभ्यासकांकडून काही त्रुट्या झालेल्या दिसतात. जाधवराव घराण्यातील लखुजीराव जाधवराव हे निजामशाहीचे मातब्बर सरदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे देखील मोगल व निजामशाही मातब्बर सरदार होते त्यांच्या मनसबीच्या नोंदी व काही फर्माने उपलब्ध आहे त्याचे भाषांतर करताना देखील ते बादशहाचे चाकर होते असा खोडसाळपणा अभ्यासकांनी केलेला दिसतो तो पुर्णपणे चुकीचा आहे. सदरील प्रमाणात भिकुजींनी दौलतीची सेवा करावी व वर्तमान अधिकारी व भावी अधिकारी जनता तसेच तेथील शेतकरी यांनी भिकुजींना तेथील देशमुख मानावे व भिकुजींच्या सल्ल्याबाहेर कोणीही जाऊ नये असा हुकुम आहे . शहाजानी पाठवलेले प्रमाण भिकुजी चव्हाण नावाने आहे यातून एक गोष्ट स्पष्ट होते शिवपुर्वकाळापासुन मोहिते घराण्यामध्ये चव्हाणहंबीररावमोहिते लावण्याची परंपरा होती. फर्मानावर शहाजहानची मोहर आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...