विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 June 2023

मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे भाग 7

 






मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे
भाग 7
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
जावळीवर हल्ला
आदिलशहाच्या परवानगीशिवाय येसाजी चंद्ररावपदी बसल्याने चंद्ररावाचे आदिलशहाशी संबंध बिघडलेले होते. त्यातच जानेवारी १६५६ मध्ये औरंगजेब कुतुबशाहीवर आक्रमण करण्यासाठी उतरला होता. त्यावेळी कुतुबशाहीच्या मदतीसाठी आदिलशाही सैन्य सरहद्दीवर गोळा झाले होते. त्यामुळे आदिलशहाकडून चंद्ररावाला कोणतीही मदत मिळण्याची शक्यताच नव्हती. याचा फायदा घेऊन महाराजांनी तीच वेळ जावळीवर स्वारी करण्यासाठी निवडली. सामोपचाराने जावळी प्रकरण मिटत नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. रघुनाथ बल्लाळ सबनीस, संभाजी कावजी कोंढाळकर, सूर्यराव काकडे, कान्होजी नाईक जेधे, बांदल देशमुख व स्वतः महाराज एवढे सर्व या मोहिमेवर जाण्याचे ठरले. चंद्ररावाचे प्रमुख कारभारी व सैन्य जावळीच्या जोहोरबेट, चतुर्बेट, शिवथर खोरे, व खुद्द जावळी या ठिकानी विखुरलेले होते. या सर्व ठिकाणी अकस्मात हल्ला करून चंद्ररावाची जावळी काबीज करण्याचे ठरले. व त्यानुसार संभाजी कावजी चतुर्बेटावर, रघुनाथ बल्लाळांनी जोहोरखोऱ्यावर तर काकडे, जेधे, बांदल व खुद्द महाराजांनी जावळीवर हल्ला केला.
निसनीच्या वाटे वरून दिसणारे विहंगम दृश्य
दरे गावर उतरणारी हि डोंगर धार म्हणजेच निसनीची वाट
महाराजांच्या जावळीवरील स्वारीची सुरुवात जोर खोऱ्यावरील हल्ल्याने झाली. याचे कारण असे की, जावळीच्या खोऱ्यात उतरण्याचा मार्ग महाबळेश्वराच्या पठारावरून होता. १७ व्या शतकात वाईवरून महाबळेश्वराच्या पठारावर जायची वाट तायघाटातून होती. पण वाई परगणा त्यावेळी आदिलशाहीच्या ताब्यात असल्याने तो मार्ग त्यांच्या उपयोगाचा नव्हता. तेव्हा हिरडस मावळातून रायरेश्वराच्या पठारावरून जांभूळ खोऱ्यात व तिथून जोर खोऱ्यात जाणारी वाट महाराजांच्या सैनिकांनी घेतली. जोर खोऱ्यातून महाबळेश्वरच्या पठारावर जाणारी वाट गणेशदऱ्यातून जाते. जेधे करिन्यात दिलेल्या हकीगतीनुसार, जांभळीच्या मोर्यांवर हल्ला करून त्यांना जेध्यांनी आधीच पिटून लावले होते. त्यामुळे जांभळीस कोणी मोरे नव्हते. त्यानंतर महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना स्वारांच्या जमावानिशी पाठविले. त्यांनी हणमंतराव यास मारून जोर घेतले. जावळी मात्र राहिली होती.
यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (
यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (शि.का.). महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. मोठी तुकडी रडतोंडी घाटाच्या दिशेने गेली तिकडे मोऱ्यांच्या सैन्याने प्रतिकार केला. छोट्या तुकडीसोबत खासे महाराज महाबळेश्वर मार्गे निसणीच्या घाटाने जावळीत उतरले. त्यांना विशेष प्रतिकार झालाच नाही. दुपारपर्यंत मोठी फौजही तिथे पोहचली आणि शिवाजीराजांनी जावळी हस्तगत केली. शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६] (जे.श.)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...