विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 June 2023

मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे भाग २

 



मराठाशाहीतील जावळीचे मोरे घराणे
भाग २
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
चंद्रराव मोरेंची ओळखच चंद्रराव मोर्यांच्या बखरीचे बखरकार वाघाच्या शिकारीच्या प्रसंगातून करवून देतो. विजापूरच्या डोणप्रांती पातशहा शिकारीला गेला होता. शिकारीला एक वाघ कोणालाच दाद देत नव्हता. तेव्हा चंद्रराव मोरे वाघाला मारायला पुढे सरसावतात. या प्रसंगाचे वर्णन सुरेख केले आहे. वाघ समोर आल्यावर मोरे म्हणतात 'उठ कुत्र्या बसलास काय. तू आमचे एक कुत्रे आहेस !'. यातून बखरकाराने चंद्ररावच्या 'मर्द आदमी, आडेल शिपाई, आजदादेघरचा राउत मर्दाना ' या विशेषणातुन दर्शवलेली रग दिसते. शेवटी वाघासोबतच्या रणात मोऱ्यांचा विजय होतो. बादशाह चंद्ररावाना इनाम मागायला सांगतो. चंद्रराव मुऱ्हे प्रांतातली जावळी आणि राजे हा किताब मागतात. बादशाह मागितलेला इनाम देतो आणि सोबत हत्ती, घोडा, कडी, मोतियांची जोडी देतो.
पण चंद्रराव हुशार; इतक्यावर थांबत नाहीत. मोरे म्हणतात आता आम्ही राजे पण आमची भावकी, नातेवाईक आमच्या तोलामोलाचे नाही राहिले. आम्ही सोयरिक करायची तर कोणाकडे करावी. असे साधारण कारण पुढे करून बादशाह कडून आपल्या नातेवाईंकाना पदव्या, मानमरातब मागून घेतात. ते सर्व मान पुढीलप्रमाणे :
१२ जणांना 'राव'किताब : पडेमकर, कुंभारखाणी सुर्वे, सडेकर शिंदे, पाकडे, महामुलकर, गणसावंत, खोपकर, हालमकर हंबीरराव, दलवीरराव, हंबीरराव, येरुणकर , घासेराव चव्हाणराव.
'राव' किताब आपल्या भाऊबंदाना : देशकरराव, मुदोसकरराव, कलाकराव, हाटकेटकर, वीरमणकरराव, बिरवाडकर, आस्तनकर, मुधगावकर.
६ पुत्रांना खालील मरातबी : प्रतापराव जोरामध्ये, हणमंतराव जावलीमध्ये, गोविंदराव महीपतगडी, चयाजीराव जावळी राज्यासनिध, शिवतरकर यसवंतराव यांना बादशाह कडून हिरवे निशाण आणि दौलतराव (यांना काय दिले ते नमूद नाही )
या सर्व माराताबी आणि इनामे घेउन १२,००० सैन्यासहित चंद्रराव मोरे जावली वर चालून गेले. जावळी काबीज झाली. मोऱ्यानी तिथे राजगादी सुरु केली. पुढे हि गादी ८ पुरुषांकडून चालवली गेली असे संकेत लिहिलेत (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष). त्या ८ पुरुषांची नावे अशी : चयाजी राजे, भिकाजी राजे, शोदाजी राजे, येसाजी राजे, गोन्दाजी राजे, बाळाजी चंद्रराव राजे आणि दौलतराव राजे.
जावळी प्रांताचा नकाशा
जावळी परिसरातील किल्ले, घाटवाटा आणि प्रमुख गावांचा नकाशा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...