विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 31 July 2023

"श्री राजाराम छत्रपती

 

आज छत्रपती राजाराम महाराजांची जयंती🙏🏻🙏🏻🙏🏻
राजर्षी शाहू महाराजांनंतर करवीर संस्थानच्या गादीवर आलेल्या या राजांनी राजर्षींचे अपूर्ण राहिलेले कार्य जोमाने पूर्ण केले. आधुनिकतेची आवड असणाऱ्या राजाराम छत्रपतींनी कोल्हापुरात विमानतळ सुरू करण्यापासून ते पुण्यातील शिवस्मारक योजना पूर्ण करुन तिथे अश्वारुढ शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यापर्यंतची अनेक कामे पूर्ण केली. शिक्षणाची विशेष आवड असल्यामुळे कोल्हापूरातील शैक्षणिक चळवळ जोमाने चालवली तर मुलांमुलीत धाडस निर्माण होण्यासाठी बाल स्काऊटची स्थापना ही कोल्हापुरात केली. राजाराम छत्रपतींनी कोल्हापुरात केलेल्या वैद्यकीय सुधारणा तर आजही आदर्श घेण्यासारख्या आहेत. त्यांनी केलेल्या वैद्यकिय सुधारणा थोडक्यात पहा...
हाॕस्पिटल समोरील वातावरण प्रसन्न व शुद्ध राहावे यासाठी पाण्याचे हौद चालू करून बाग तयार केली. पायदळातील लोकांना काॕलरा प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी ९०० रूपयांचे विशेष सहाय्य दिले. कोल्हापूर शहरात देवीच्या साथीवर प्रतिबंधक उपाय योजला. करवीर इलाख्यात प्लेगची साथ कमी न झाल्यामुळे बाहेर गावाहून ऑफिसास येणाऱ्या नोकर लोकांची डायरी एक महिना माफ केली. इचलकरंजीत प्लेगची साथ आल्याने तेथील लोक जयसिंगपुरला राहण्यास गेल्यामुळे तेथील हवा दूषित होऊन प्लेगची साथ वाढू नये म्हणून जयसिंगपूरच्या गाम्रपंचायतच्या अध्यक्ष (सरपंच) यास विशेष अधिकार दिले. गडहिंग्लज येथील प्लेग निवारणार्थ जरुर ती मदत, औषधे इ. इलाखा पंचायतीकडून म्युनिसिपल कमेटीस दिली. प्लेगचा प्रार्दुभाव वाढत्या प्रमाणात असल्याने प्रतिबंधक कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी ग्रँट मंजूर केली. पेटानिहाय डिस्पेन्सरीकडील डॉक्टर हक्काच्या अगर दिर्घ मुदतीच्या रजेवर जातात त्यावेळी चार्ज कंपौंडरकडे राहतो हे बरे नाही. सबब एक जादा डॉक्टर नेमला. ज्या पेट्याचे ठिकाणी बाजार रविवारी भरतो त्या पेट्यातील दवाखान्यास असलेली रविवारची सुट्टी बुधवारी दिली. गरीब लोकांचे औषधपाण्याची सोय करणेचे अटीवर जयसिंगपूर वसाहतीतील ब्लॉक सवलतीच्या दराने दिला. हर एक्सलन्सी लेडी लिनलिथगो यांचे ऑल इंडिया ट्युबरक्युलोसीस असोसिएशनच्या स्थापनेस उभारणेत आलेल्या फंडास पाठविलेल्या रकमेस खास मंजुरी, मौजे शाहुवाडी येथे इलाखा पंचायतीस दवाखाना बांधणेस जागा मोफत दिली. जनावरात फैलावणाऱ्या साथीच्या रोगाच्या बंदोबस्ताकरिता इलाखा पंचायतीकडे एक हंगामी डॉक्टर व एक शिपाई नेमून त्यांचे पगाराकरिता लागणाऱ्या रकमेचे खर्चास मंजुरी दिली.
अशा अनेक सुधारणा तर राजाराम छत्रपतींनी केल्याच शिवाय कोल्हापुरातील आजचा प्रमीलाराजे दवाखाना (थोरला दवाखाना) हा भविष्यात अपुरा पडू शकतो म्हणून आताच्या DYP माॕल समोरील जागेत तत्कालीन महाराष्ट्रातील भव्य दवाखाना उभारण्याची योजना आखली होती. या दवाखान्याचा पायाही बांधला गेला होता पण राजाराम छत्रपतींच्या निधनामुळे ही योजना अपूर्ण राहिली. जर ही महत्वकांक्षी योजना पूर्ण झाली असती तर आज कोल्हापूर आणि परिसरात नव्याने दवाखाने बांधण्याची गरजच भासली नसती इतकी ही योजना भव्य होती.
अशा या राजाराम छत्रपतींचे

"श्री राजाराम छत्रपती : चित्रमय चरित्र" हा ग्रंथ आम्ही साकार केला आहे. तो A4 साईज मध्ये आर्ट पेपर मध्ये आहे. पृष्ठ संख्या 244 आहे. मूळ किंमत 1000 ₹ आहे तो आमच्याकडे सवलतीत 750 ₹ (+पोस्टेज खर्च )मिळेल.
डॉ. देविकाराणी पाटील
इंद्रजित सावंत
31 जुलै 2023
कोल्हापूर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...