प्रसंग असा की शहजादा कामबक्ष याने एकदा पाणी पिण्याची नक्षीकाम केलेले एक पाणी पिण्याचे पात्र, त्याच्यावरचे झाकण, एक तबक व एक किश्ती अशी पाच वस्तू विकत घेऊन आबदरखान्यात पाठवली. आबदरखान्याचा दरोगा असलेल्या मुहम्मदकबीर याने ही पात्रे औरंगजेब बादशहाला दाखवली आणि सांगितले की " ही पात्रे कामबक्ष याने पाच हजार रुपयांना विकत घेतली आहेत" यावर औरंगजेब भडकला, ज्या नाजर ख्वाजाइज्जत याने ही पात्रे विकत घेऊन पाठवली होती त्याची मनसब औरंगजेबाने ५० ने कमी केली शिवाय अशी पात्रे पुन्हा आणू नयेत अशी आज्ञा देत ज्या व्यापाऱ्याने हे पात्रे विकली आणि कारागिरांनी तयार केली त्यांना देखील कैद करण्याचे आदेश देखील दिला...
काबुलपासून बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून कावेरीपर्यंत साम्राज्य पसरले होते असा २२ सुभ्यांचा व ५० कोटी महसूल असलेला विक्षिप्त बुद्धीचा चिंगूस आलमगीर औरंगजेब बादशहा !!
- राज जाधव
No comments:
Post a Comment