#रविराव_शिंदे_वाडा - लोणीकंद जि. पुणे
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकंद या गावी मराठा साम्राज्यातील एक असामी रविराव शिंदे यांचा वाडा अखेरची घटका मोजत आहे. लोणीकंद हे गाव पुणे - नगर महामार्गावर पुण्यापासून २५-३० कि.मी अंतरावर आहे. गावात प्रवेश केल्यावर दुसऱ्या गल्लीत हा वाडा आहे. दुमजली वाडा जीर्ण अवस्थेत उभा आहे. वाड्याभोवती दगडी तटबंदी आहे. लाकडी तुळईंवर वाडा उभा आहे. त्याचा भक्कमपणा पाहिल्यावर लक्षात येतो.
या घराण्याचा मूळ पुरुष रविराव शिंदे मानले जातात. हे त्या घराण्याच्या वंशावळीवरून लक्षात येते. 'सूकलोणी तथा लोणीकंद बाभळसर (खु.), राळेगण (थेरपाळ) ग्वाल्हेर या ठिकाणी यांचे वंशज विखुरले आहेत. या घराण्याच्या कैफियतीमध्ये या घराण्याची हकिगत दिली आहे. त्यातील शिंदे रविराज हे औरंगाबादकडे चाकरीस होते. दुसरे राघोलक्ष्मण हे मल्हारराव होळकरांच्या पदरी होते.
तुकोजीराव यांनी बादशाहाची मर्जी संपादन केली. बादशहाने खूश होऊन त्यांची सरदारी वाढवून त्यांना नगारा, निशाण, पालखी व फौजेचा सरंजाम बहाल केला. त्यानंतर झालेले तिसरे तुकाजीराव व मानाजीराव हे सातारकर शाहूमहाराज यांच्याकडे सरदारीवर राहिले. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी संतोषी होऊन मौजे लोणी येथील मोकासा मानाजीराव शिंदे रविराव यांना दिला. त्याप्रमाणे वहिवाट चालत आली.
इ.स. १७६३ मध्ये मराठ्यांची निजामअलीबरोबर राक्षसभुवन इथे लढाई झाली. त्या लढाईत संताजी बिन मानाजी राव सुभानराव बिन मानाजीराव याशिवाय सातजणांनी फार परिश्रम घेतले. कस्त मेहेनत करून माणसे जमा करून रघुनाथराव पेशव्यांना हत्तीसह काढून आणिले.
साभार विकास जी चौधरी
No comments:
Post a Comment