विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 12 August 2023

महंमद बंगशाची छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे #सरदार पिलाजीराव जाधवराव यांनी खोड मोडली


 महंमद बंगशाची छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे #सरदार पिलाजीराव जाधवराव यांनी खोड मोडली -
1722 मध्ये बाजीराव व पिलाजी उत्तरेत माळव्यात गेले होते. बुंदेलखंड पर्यंत दोघांनी मजल मारली होती. 1726 मध्ये राणोजी भोसले, रघुजी भोसले, अंबाजी त्रिंबक, आनंदराव पवार यांच्या सह पिलाजी जाधवराव यांनी माळव्यात मोठी स्वारी केली व दयाबहाद्दराशी युद्ध केले होते. त्यानंतर पालखेडच्या युध्दानंतर सरलष्कर दावलजी सोमवंशीचा हुकूमत बसवून देत पिलाजी व बाजीराव देवगड चांदा मार्गाने पुन्हा माळव्याकडे गेले. बंगशाशी युध्द करून छत्रसालास मदत केली. बंगश छत्रसालावर चालून आला होता. छत्रसालाने या वेळी बाजीरावांकडे दुर्गादास ह्या आपल्या विश्वासु माणसाह पाठवून मदत मागितली होती. तेव्हा याप्रकरणात पिलाजी जाधवराव यांच्या मार्फत बोलणी झाली. कारण बाजीरावांचा त्यांच्या वर भरोसा होता. त्याप्रमाणे छत्रसालाच्या मदतीला बाजीराव बुंदेलखंडास निघाले. त्यांच्या बरोबर पिलाजी जाधवराव हेही होते. महंमद बंगश आपल्या वीस हजार फौजेनिशी पिलाजी जाधवराव यांच्या वर चालून आला. पिलाजींनी त्याला जेरीस आणले. बंगशाची कोंडी केल्याने शत्रू सैन्यात अन्नाचा दुष्काळ पडला. बंगशास मराठे गढामंडळ देवगडच्या जंगलातून येतील असे वाटले नव्हते. मराठ्यांनी बंगशाची रसद सामग्री बंद केली. बंगशाचे व त्याच्या सैन्याचे खूप हाल झाले. शेवटी 30 मार्च 1726 रोजी जैतापूर चा किल्ला पिलाजींनी जिंकला

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...