विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 25 August 2023

सासवड मध्ये मराठेशाहीमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये पराक्रम गाजवलेल्या तीन महत्वाच्या व्यक्तींची समाधी

 

पुण्याजवळील सासवडमध्ये आपण बऱ्याच वेळा गेला असाल.सासवड हे ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक घटनांचे केंद्रबिंदू राहिला आहे.याच




सासवड मध्ये मराठेशाहीमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये पराक्रम गाजवलेल्या तीन महत्वाच्या व्यक्तींची समाधी आहे हे तुम्हाला माहिती आहे का?तसेच संतश्रेष्ठ सोपानदेवांचे समाधी मंदिर देखील येथेच आहे.याचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत त्यामुळे लेख संपूर्ण वाचा!
१)संतश्रेष्ठ सोपानदेवांचे समाधीमंदिर हे सासवड मध्ये चांबळी नदीच्या काठावर आहे.
१२९७ साली ‌सासवड येथे समाधी घेतली. संतश्रेष्ठ सोपानकाकांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली . यानिमित्ताने सासवड येथील सोपानकाका समाधी मंदिरात हा संजीवन समाधी सोहळा मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात साजरा केला जातो .ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेतल्यानंतर एक महिन्याने संत सोपंदेवांनी समाधी घेतली
२)सरदार गोदाजी राजे जगताप-सरदार गोदाजी जगताप स्वराज्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी स्वराज्याची सेवा केली स्वराज्याच्या अनेक महत्वाच्या मोहिमांमध्ये यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.शिरवळच्या सुभानमंगळ किल्ल्याच्या लढाईमध्ये मुसेखानाला यांनी उभा तोडला होता तसेच संभाजी महाराजांच्या काळात झालेल्या रायगडाच्या आक्रमानावेळी यांनी मोठा पराक्रम गाजवला होता.
३)बाळाजी विश्वनाथ हे शाहू महाराजांचे पक्षकार होते.छत्रपती श्री शाहू महाराज यांची मोगली तावडीतून सुटका करण्यात यांचा बराच वाटा होता.शाहू महाराजांनी यांच्या कामगिरीवर खुश होऊन यांना पंतप्रधान पद दिले होते.हे थोरले बाजीराव यांचे वडील होत.
४)सरसेनापती बाजी पासलकर-:स्वराज्याचा श्री गणेशा व्हायच्या आधीपासूनच यांनी शिवरायांना सुरुवातीपासूनच मोलाची साथ दिली.खळद बेलसर च्या लढाईमध्ये फत्तेखानचे पुरंधरावरील आक्रमण परतून लावताना यांना वीरमरण आले.
महत्वाची टीप-:👉"गुरुवारी नारायणपूर दर्शनाला आपण जातो तेव्हा वाट थोडी वाकडी करून वरील समधीस्थळांचे आवर्जून दर्शन घ्या आणि आपल्या दैदिप्यमान इतिहासाला अवश्य प्रणाम करा!"🚩🙏👈
©सह्याद्रीच्या पाऊलखुणा
लेख नावासह आवर्जून शेअर करा,आपला दैदिप्यमान इतिहास जगाला दाखवायला परवानगीची गरज अजिबात नसते!👈

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...