होळकर घराण्याच्या कुलदेवतेचा शोध
महापराक्रमी मल्हारराव होळकरांनी स्थापन केलेल्या होळकर घराण्याच्या अज्ञात कुल देवतेचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक श्री सतीश सोनवणे यांनी लावला.
काही दिवसापूर्वी शहाजापुर गावा जवळील कवडेश्र्वराच्या डोंगरावर गड भ्रमंती चे द्विशतक साजरे करणारे पत्रकार श्री. सुरेंद्र शिंदे सर आणि श्री सतीश सोनवणे यांनी कवडे श्र्वराला भेट दिली. डोंगरावर वालूबा नदीचे उगम स्थान आहे. त्याजवळ रानुआई चे मंदीर आहे. ही राणू आई म्हणजेच होळकर वंशावळी मध्ये उल्लेख असलेली राजो बाई होय. इतिहासाचार्य राजवाडे यांनी महेश्वर संस्थांनच्या कागदपत्र मध्ये होळकर घराण्या च्या दोन वंशावळीचा शोध लावलेला आहे. त्यातील पहिली जुनी अस्सल वंशावळ अशी -श्री कुलस्वामी देव खंडेराव व झाळसाबाई व बानाबाई, गड जेजुरी, जानोबाई, तळ कोंकण. धरमपुरीं भवाणी, तुकाई तुळजापूरची. तिसरी, यमाई कवठ्याची. चौथी, राजोबाई कवड्या डोंगरची.
याचा उल्लेख त्यांनी 'श्रीसरस्वती मंदिर ' या द्वै मासिकात लिहीलेल्या ' होळकरांची वंशावळी ' या लेखात केला आहे. कवड्या डोंगर हा नगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील शहाजापूर आणि नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा या गावाच्या दरम्यान आहे. स्थानिक लोक या देवीला रानो बाई म्हणतात. डोंगरावर देवीचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरा समोर दीपमाळ आहे. देवीची मूर्ती कमरेवर हात देऊन उभी असलेली आहे. राजवाडेनी चुकून रानो बाई च्याऐवजी राजो बाई लिहिले असावे. या देवी विषयी स्थानिकाना फारशी माहिती नाही. होळकर राज वंशाची कुल देवतेचा शोध लागल्याने एक नवीन माहिती उजेडात आली आहे.
No comments:
Post a Comment