विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 19 September 2023

राजे रावजगदेवराव जाधवराव

 


राजे रावजगदेवराव जाधवराव

१) राजे रावजगदेवराव हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे तृतिय पुत्र बहादुरजी यांचे नातु होत. यांची शाखा देऊलगावराजा शाखा म्हणुन प्रसिद्ध पावली. राजे बहादुरजी हे सुरुवातीस राजे लखुजीराव यांचे बंधु भुतजी /जगदेवराव याना दत्तक गेलेले होते,परंतु ते इ सन १६२९ मध्ये लखुजीराव यांच्या हत्येनंतर वतन प्राप्तीसाठी मुलवतनाला आलेले होते आणी पुढे यांचीच शाखा देऊलगावराजाची प्रसिद्ध शाखा म्हणुन प्रसिद्ध पावली.राजे बहादुरजी याना पुत्र नव्हता म्हणुन त्यानी त्यांचे बंधु राजे राघोजी यांचे पुत्र राजे दत्ताजीराव हे दत्तक घेतले होते. याच राजे दत्ताजीराव यांचे पुत्र रावजगदेवराव होत.
२) पिता...राजे दत्ताजीराव बीन राजे बहादुरजी
३) बंधु..... राघोजीराजे व यशवंतराव.
४) माता.... सगुणाबाईसाहेब
५) पुत्र...... मानसिंग,राघोजीराव,यशवंतराव,दत्ताजीराव आणी तुलजाजीराव
६) पत्नि...दुर्गाऊ,सुलाऊ व तुलजाऊ
७) पिता राजे दत्ताजीराव यांचा १० नोव्हेंबर १६६५ रोजी गुलबर्गा युद्धात मृत्यु झाल्यानंतर त्याना वतन प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे वय अवघे १४ वर्षे होते. जाधवराव वतन सर्व शाखा मध्ये एकत्रीत होते परंतु राजे दत्ताजीराव यांच्या मृत्युनंतर सिंदखेडकर जाधवराव बंधुमंडल शाखानी म्हणजे आडगावकर,उमरदकर,किनगावकर,जवलखेडकर व मेहुणेकर बंधुमंडलानी वतनातुन राजीनामे दिले म्हणुन रावजगदेवरावास एकट्यासच वतनप्राप्ती झाली.
८) कारकिर्दितीच्या सुरुवातीसच त्यानी वाघीनगिरीचा किल्ला घेऊन आपला पराक्रम गाजवला.रावजगदेवराव यांच्या सोबत या मोहिमेत त्यांचे मानकरी भानवशे,धारराव,झुंझारराव,रणनवरे,देवरे,निकम,वाघ,चौरे,भोसले,पवार,मानेराव,घाटे,मोरे आदी सरदार होते.
९) रावजगदेवरावाना सप्तहजारी मनसब व जहागिर दिलेली होती.
१०) बादशहाने जेव्हा हिंदु जनतेवर जिझिया कर लावला व हिंदुना मुस्लिम बनवण्याचे चालु केले,त्यासमयी रावजगदेवराव व जयपुरचे राजे जयसिंगराव यानी एकत्रीत येऊन तमाम दक्षिणी मराठा मंडल नाईक निंबालकर,राजे घोरपडे,मोहिते,मानेराव,घाटगे,झुंझारराव मंडलास एकत्रीत आणुन बादशहाच्या सैन्यासोबत युद्धाची तयारी केली.बादशहाने गर्द होण्याचा समय समजुन समेट घडवुन आणला व कर माफी केली व हिंदु सरदारांचे धर्मांतर बंद केले. त्यासमयी या जगदेवरावाना रावजगदेवराव राजे जाधवराव आणी जयसिंगराजे याना सवाई जयसिंग असे किताब दिले.
११) रावजगदेवराव हे स्थापत्य व कलाकौशल्याचे आवड असलेले होते.म्हणुनचयांच्या कारकिर्दित खजाना विहीर,बालसमुद्र,गंगासागर,रघुवन,कुंजबन,गाढवदरा,रायेबारेवर आदि बारवा बनवल्या. सिंदखेडराजा येथे किल्ला बांधण्यासाठी कालाकोट चे बांधकाम चालु केले,परंतु बादशहाने 'मराटे आधीच तरवार बहाद्दर जबरदस्त,त्यास किला जालियावर पातशहाशी बदलतील अशी कलपणा घेऊन मना केला.' आजही तो कालाकोट व त्यातील पाणी नहर पहावयास मिलतो.जहागिरीचा कारभार देखिल खुप चोख ठेवला होता.
रावजगदेवराव हे खुप धार्मिक होते.यांची दिनचर्या ही शहाजी महाराजसाहेबासारखीच दिसुन येते. नित्यक्रम..... दो घटिका रात्री राजे जाधवराव याणी उठुन,गुरलाकरुन एक घटिका भगवतस्मरण,निर्गुण ध्यान करुन उपरांतिक पांडवगीतेचे नामस्मरण शंभर श्लोक म्हणोन ,स्नान संध्या करून देवपुजा कुलस्वामिनी देवी मातापुर व तुलजापुर व मार्तंड सातारे व जेजुरी याजला बेलफुल ,कुंकु,भंडारा वहावा. आणी बालकृषणाचे व व्यंकटेश मुर्तीस व महादेव स्फटिक लिंग थोर याजला फुल वहावे.
देऊलगाव राजा येथील बालाजी मंदिराचे बांधकाम हे राजे रावजगदेवराव यानी इ सन १६९२ साली बांधुन घेतले आणी त्या मंदिरात सिंदखेडराजा परिसरातील ,
देऊलगावराज,आडगावराजा,ऊमरद देशमूख,किनगावराजा,जवलखेडा आणि मेहुणाराजा येथील जाधवारावांना या मंदिराच्या गाभार्यात विवाह लावण्याचा मान वंशपरंपरागत आजही चालु आहे.
१२) मृत्यु..... राजे रावजगदेवराव यांचा मृत्यु १९ सप्टेंबर १७०० रोजी ब्रम्हपुरी तलावावर झाला आणि त्यांची समाधी ब्रह्मपुरी येथे आहे.
१३) वंशजशाखा.... देऊलगावराजा,महेगाव देशमुख (कोपरगाव).
आज राजे रावजगदेवराव यांचा स्मृतिदिन.
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा.........

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...