विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 1 October 2023

पानिपत ची नांदी - छत्रपती शाहू, मराठ्यांचा दिल्लीवर ताबा ,शाह वलिउल्लाह आणि देवबंदी इस्लाम !

पानिपत ची नांदी - छत्रपती शाहू, मराठ्यांचा दिल्लीवर ताबा ,शाह वलिउल्लाह आणि देवबंदी इस्लाम !
राजमाता येसूबाई यांच्या सुटकेसाठी त्यांचे पुत्र छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली आणि खंडेराव दाभाडे तसेच शंकराजी मल्हार व सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वात ३५००० ची मोठी फौज दिल्लीला रवाना झाली , बादशाह फारुखसियर ने येसूबाई व इतर राजबंदी यांच्या सुटकेच्या अटी मान्य केल्यातर ठीक नाहीतर बादशाह बाजूला करावा असा ठराव होता.
मराठे दिल्लीत पोचले आणि त्यांनी दिल्ली शहराचा ताबा घेऊन दिल्ली च्या किल्ल्याला वेढे दिले , शंकराजी मल्हार आणि हुसेन अली ने शाहूराजांच्या मागण्या बादशहा समोर मांडल्या त्या बादशाह ने अमान्य केल्या त्यावेळी तिथे दोन्ही बाजूंमध्ये अश्लील शिवीगाळ झाली. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये बादशहा समर्थकांनी मोठी दंगल घडवून आणली ज्यामध्ये २००० मराठे मारले गेले ज्यात सेनापती संताजी भोसले सुद्धा होते , या गोष्टीमुळे मराठे चवताळले... बादशाह ऐकत नाही हे बघून दुसरा पर्याय म्हणजे बादशहा हटवण्याचे निश्चित झाले.
२७ फेब्रुवारी १७१९ ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. फारुखसियर ने बंदीखान्यातून बंडाळी चे प्रयत्न केले , दिल्ली शहरातसुद्धा प्रचंड अशांतता माजली होती. बादशाह समर्थकांनी पुन्हा किल्ल्यावर ताबा मिळवला तर सय्यद बंधू हुसेन अली आणि हसन अलीं यांचे मरण निश्चित होते आणि मराठ्यांची मोहीम सुद्धा फत्ते होणे अशक्य झाले असते. १९ एप्रिल १७१९ रोजी बादशाह फारुखसियर चे मुंडके कापून त्याला संपवण्यात आले. नवीन बादशहा रफी ऊत दर्जत कडून मराठ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या येसूबाईंची सुटका झाली , मराठे पुन्हा साताऱ्याला परतले.
दिल्लीत त्यावेळी असलेला १७ वर्षाचा मौलवी शाह वली उल्लाह हे सगळं पाहत होता , त्याच्याच शब्दात सांगायचं तर "महान तैमूर च्या वारसा नष्ट होताना हि महान इस्लामी पातशाही काफिर शाहूकडून भ्रष्ट होताना मी पाहतोय " . शाह वली उल्लाह चा जन्म १७०३ चा , औरंगजेबाला धर्मांध करण्यात मोठा वाटा असलेला आणि फ़तवाह-ए-आलमगीरी चा निर्माता शाह अब्दूर रहीम हा त्याचा बाप. शाह वली उल्लाहला वयाच्या ७ व्या वर्षी कुराण मुखोद्गत होते , १४ व्य वर्षी तो मौलवी झाला , अरेबिया ला जाऊन मुहम्मद वहाब यांच्याकडे वर्षभर राहिला . तिथून कट्टर जिहाद त्याने भारतात आणला आणि देवबंदी इस्लाम पंथाची स्थापना केली.
"हिंदुस्थानात मराठ्यांचे आणि काफिर राजा शाहूचे राज्य आले असून पातशाही पुनःस्थापित करण्यासाठी हिंदुस्थान मी दार अल-हरब (इस्लाम ची युद्धभूमी) घोषित करत आहे" अशी घोषणा त्याने केली , यानेच उत्तरेत सर्व मुस्लिम उमरावांना हाताशी घेऊन मराठ्यांविरुद्ध आघाडी उघडली , इराणचा बादशहा नादीरशाह ला जिहाद ची प्रेरणा देऊन हिंदुस्थान वर आक्रमण करायला आमंत्रित केलं , भविष्यात हाच शाह वली उल्लाहला नादिरशहा चा शिष्य असलेल्या अब्दालीचा गुरु बनला.
शाह वली उल्लाहला याने जगात घडवून आणलेल्या २ मोठ्या गोष्टी म्हणजे पानिपत च युद्ध आणि देवबंदी इस्लाम ची स्थापना. आज जगातील ८०% दहशतवादी देवबंदी इस्लाम ला स्वतःचा पंथ मानतात,यावरून याची व्याप्ती लक्षात यावी.उदाहरणार्थ -
१. तालिबान
२. लष्कर ए जांघवी
३. तेहरीक ए तालिबान
४. जैश ए मोहम्मद
५. सिपाह ए साहिबा
१७१९ ला शाहूंनी दिल्ली जिंकल्याचे पडसाद म्हणजे पानिपत च युद्ध आणि भारतात कट्टरतावादाची सुरुवात आहे, ज्याची Geopolitical व्याप्ती जगभर आहे.
लेखन

-मालोजीराव जगदाळे

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...