विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - ३१ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - ३१ )
लेखन ::संजय क्षीरसागर
बंडखोर सरदारांचा बंदोबस्त करण्यात कित्येकदा शाहूने नको तितका उदारपणा दाखवल्याचे दिसून येते. आरंभीच्या काळात त्याचा स्वभाव तितका मृदू नव्हता. परशुरामपंत प्रतिनिधी ताराबाईस सोडून शाहूला येउन मिळाल्यावर त्याने त्यास आपल्या तर्फेने प्रतिनिधीपद दिले. पुढे चंद्रसेन जाधवाच्या बंडास परशुरामाची फूस असल्याने लक्षात आल्यावर शाहूने परशुरामास कैद करून त्याचे डोळे काढण्याची आज्ञा फर्मावली. परंतु, खंडो बल्लाळने मध्ये पडून प्रतिनिधीचा बचाव केला. त्यामुळे परशुरामाचे डोळे वाचले मात्र कैद काही टळली नाही. प्रतिनिधीच्या बाबतीत इतकी कठोरता धारण करणारा हाच शाहू पुढे दमाजी थोरात, उदाजी चव्हाण इ. च्या बाबतीत मात्र जालीम उपाय योजताना दिसत नाही. अशा सरदारांना वारंवार माफी देऊन त्याने एकप्रकारे या सरदारांना व इतरांना देखील आपल्या विरोधात बंड करण्यास प्रोत्साहन दिल्यासारखे झाले.
जो प्रकार बंडखोरांच्या बाबतीत तोच आपल्या चढेल नोकरांच्या बाबतीत करून शाहूने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. पेशवा - सेनापती, पेशवा - आरमारप्रमुख, पेशवा - प्रतिनिधी, पेशवे - भोसले इ. वादांत त्याने निर्णायक अशी भूमिका कधी घेतलीच नाही. वस्तुतः शाहू हा धनी असून इतर त्याचे नोकर होते पण असे असतानाही शाहूला आपल्याच नोकरांची भीड पडत गेली. हा कदाचित प्रदीर्घ मोगली कैदेचा परिणाम तर नसावा ना ! आपल्यापेक्षा जो जबरदस्त असेल त्याच्यासमोर मान झुकवण्याची जी सवय शाहूला कैदेत असताना लागली होती ती नंतरही कायम राहिली होती असे कित्येकदा वाटते. पण याचा परिणाम मराठी राज्याला अतिशय घातक असा झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...