विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - ३० )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - ३० )
लेखन ::संजय क्षीरसागर
शाहूच्या एकूण राजकीय कारकिर्दीतील १७२० -४० हि वीस वर्षे यासाठी महत्त्वाची आहेत कि, बाजीराव - चिमाजीचे पराक्रम एकापाठोपाठ एक अशा प्रकारे झळकल्याने पेशवेबंधूंना कमालीचे महत्त्व आले आणि त्यामानाने इतर प्रधान व सरदारांचे महत्त्व घटत गेले. इंचबर्डन व गोर्डन या इंग्रज वकिलांनी स. १७३९ च्या जून महिन्यात शाहू व पेशव्यासोबत झालेल्या भेटीत हाच निष्कर्ष काढला.
एका बाबतीत मात्र शाहूने पेशव्यांना फारसे जुमानल्याचे दिसत नाही व ती बाब म्हणजे कोल्हापूरकर संभाजीचे प्रकरण ! कोल्हापूरचे राजकारण त्याने स्वतःहून चालवले. त्यात पेशव्याचा किंवा इतर कोणाचा शिरकाव होऊन दिला नाही पण हि कसर पुढे नानासाहेबाने बहरून काढली. पेशवेपद मिळताच संभाजीला शाहूच्या नंतर सातारची गादी देण्याचे मान्य करून गडी मोकळा झाला. नानासाहेबाच्या काळात आजारपण व घरगुती भांडणे यांमुळे शाहू व्यापला जाउन राजकारणावरील त्याचे लक्ष उडाले. पण हाच काळ राजकीय संक्रमणाचा असल्यामुळे आणि अशा परिस्थितीला तोंड देण्याची कुवत नानासाहेबाची नसल्याने भविष्यात मारतही राज्यावर पानिपतचे अरिष्ट ओढवले. उदाहरणार्थ, याच काळात शिंदे - होळकरांनी जयपूर प्रकरणी नसत्या भानगडी करून राजपुतांचे वैर पदरात पाडून घेतले. शाहू व राजमंडळ यांच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या नादात शिंदे - होळकर स्वतंत्रपणे वागू लागल्याचे नानासाहेबाच्या लक्षात आलेच नाही. पुढे आपली चूक ध्यानात आल्यावर त्याने या दोन सरदारांमध्ये भांडणे लावून त्यांना दुर्बल करण्याचे आत्मघातकी धोरण स्वीकारले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...