भाग १
लेखन ::सतीश राजगुरे
असे
म्हटले जाते की नागपूर शहराची स्थापना गोंड राजपुत्र बख्तबुलंद शहा याने
केली. याच काळात म्हणजे 18 व्या शतकाच्या सुरूवातीला येथे अनेक तलाव
बांधले गेले. त्यापैकी दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील तटांवर एक टाकी होती
तिला जुम्मा टाकी म्हणात. जुम्मा टाकीचे पाणलोट क्षेत्र पश्चिमेकडील
टेकड्यांवर होते, ज्याला सीताबर्डी असे म्हणतात. रघुजीराजे भोसले
(1739–1755) यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी देवगडसह चांदा आणि
नागपूरचाही ताबा घेतला होता. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांची
नागपूर हा भोसल्यांचा बालेकिल्ला बनला.
सीताबर्डी
हे नाव दोन यदुवंशी भावांवरून पडले - शितलाप्रसाद आणि बद्रीप्रसाद गवळी,
ज्यांनी 17 व्या शतकात या भागावर राज्य केले. हे ठिकाण शितलबद्री म्हणून ओळखले जायचे, जे ब्रिटीश राजवटीत सीताबर्डी बनले. अश्याप्रकारे, सीताबर्डी नावाचा अपभ्रंश झाला.
No comments:
Post a Comment