अजातशत्रू शाहू
( भाग - २२ )
लेखन ::संजय क्षीरसागर
पालखेड,
जंजिरा इ. मोहिमांच्या वेळी सातारा न सोडणाऱ्या शाहूला स. १७३७ मध्ये
अचानक स्वारी - शिकारी करण्याची लहर आली. आपले सर्व अष्टप्रधान मंडळ,
प्रमुख सरदार, तोफखाना, जनानखाना सोबत घेऊन मिरजेचे ठाणे आपल्या ताब्यात
घेण्याच्या उद्देशाने शाहू सातारा सोडून बाहेर पडला. त्याच्या या बादशाही
स्वारीचे रसभरीत वर्णन मल्हार रामराव चिटणीसने आपल्या बखरीत केले आहे. स.
१७३७ मध्ये त्याने उंब्रज येथे आपली मुख्य छावणी उभारली व तेथून मिरज
ताब्यात घेण्यास आणि उदाजी चव्हाणास समज देण्यास सरदार रवाना केले. नंतर
स्वतः शाहू मिरजेच्या रोखाने गेला. स. १७३९ च्या ऑक्टोबर आरंभी मिरजेचे
ठाणे शाहूच्या ताब्यात आले. मिरज ताब्यात आल्यावर शाहू साताऱ्यास परत
फिरला. वास्तविक या स्वारीतून फायदा असा काही विशेष झाला नाही. परंतु,
आपले लष्करी नेतृत्व परत एकदा आजमावण्याची व लोकांना आपल्या लष्करी
कौशल्याची चमक दाखवण्याची शाहूची इच्छा मात्र काही प्रमाणात पुरू झाली.
विशेष म्हणजे याच काळात बाजीराव भोपाळ येथे निजामाशी लढत होता तर वसईला
चिमाजीआपा पोर्तुगीजांशी झगडत होता. दिल्लीवर याच वर्षी नादिरशहाची धाड
येउन पडली होती. अशा प्रचंड मोठ्या प्रकरणांत मराठी फौजा ठिकठिकाणी
गुंतलेल्या असताना शाहूने हि मोहीम आखून यशस्वी करून दाखवली इतकेच फारतर
म्हणता येईल.
No comments:
Post a Comment