भाग २
लेखन :सतीश राजगुरे
इंग्रज
आणि मराठे यांची वऱ्हाड प्रदेशात सत्ता संघर्षाची लढाई सुरू झाली.
इंग्रजांचा सेनापती वेलस्ली याच्या आदेशानुसार नागपूरकर भोसले यांच्या
सैन्यावर हल्ला करण्यात आला. अडगावच्या युद्धप्रसंगी शिंदे व भोसले यांच्या
फौजा शिरसोली व अडगाव भागांत एकत्र आल्या होत्या. तर लॉर्ड वेलस्ली ने
पाथर्डी येथे आपले सैन्य जमवले. वेलस्लीने पाथर्डी गढीच्या बुरुजावरुन
दुर्बिणीने टेहळणी केली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण
मराठ्यांचे सैन्य लढाईकरिता सज्ज होते.
याबाबत वेलस्ली लिहितो, "मराठ्यांचे सैन्य पायदळ, घोडदळ आणि तोफखाना एका ओळीत अडगावच्या मैदानात सज्ज होते आणि हे स्थान आमच्या जागेपासून ६ मैलांवर आहे."
युद्धात
इंग्रज सैन्याचे नेतृत्व कॅप्टन केन तर मराठा सैन्याचे नेतृत्व मनाजीबापू
भोसले हे करत होते. या लढाईत मराठ्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व
इंग्रजांची दमछाक केली. मराठ्यांच्या तोफांनी आग ओकून इंग्रज सैन्यास पळवून
लावले. अठरा पगड जातीतील सर्व सैनिक जीवाची बाजी लावून लढत होते. अकोली
जहांगीर येथील मराठ्यांचे तोफखाना प्रमुख कर्ताजीराव जायले यांनी स्वतःचे
बलिदान देऊन कॅप्टन केन याला ठार केले.
त्यामुळे
सुरुवातीला मराठ्यांचे पारडे जड वाटत होते. आम्ही ही लढाई गमावलीच होती,
असे खुद्द वेलस्लीने म्हटले आहे. पण सेनापती वेलस्लीच्या कुशल नेतृत्व व
युद्धतंत्रामुळे या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला. लढाईनंतर मराठा
सैन्याची पांगापांग झाली. इंग्रजांनी पाठलाग करून मराठ्यांची कत्तल केली.
भोसल्यांच्या ३८ तोफा व मोठा दारूगोळा, हत्ती, उंट व इतर सामान
इंग्रजांच्या हाती सापडले.
दरवर्षी असंख्य नागरिक या युद्धभूमीवर जाऊन देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शूरविरांना श्रद्धांजली अर्पण करतात.
No comments:
Post a Comment