विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 October 2023

अजातशत्रू शाहू ( भाग - १३ )

 


अजातशत्रू शाहू
( भाग - १३ )
लेखन ::संजय क्षीरसागर
दिल्ली मोहीम पार पाडल्यावर बाळाजीच्या मदतीने शाहूने आपल्या राज्यकारभाराची फिरून एकदा घडी बसवण्याचा प्रयत्न केला. मोगलांसोबत झालेल्या दीर्घकालीन संग्रामात कित्येक मराठी सरदार मोठमोठ्या फौजा बाळगून स्वतंत्रपणे मोहिम आखत होते. या सरदारांनी लष्करी बळावर बराच मुलुख काबीज केला होता. या सरदारांच्या सत्तेला मान्यता देऊन त्यांनी नाममात्र शाहूचे आधिपत्य मानावे अशा प्रमुख अटीवर बाळाजी विश्वनाथाने त्यांना सातारच्या दरबारात खेचले. यामुळे शिवाजीनिर्मित स्वराज्याचे सरंजामशाहीत रुपांतर झाले असले तरी याची सुरवात राजारामच्या काळातच झालेली असल्याने प्रस्थापितांना शाहूने फक्त मान्यता दिली असेच म्हणावे लागते. स. १७२० मध्ये राज्यकारभाराची घडी बसवत असताना बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू झाला. बाळाजी विश्वनाथ मरण पावल्यावर रिक्त झालेले पेशवेपद शाहूने, बाळाजीच्या मोठ्या मुलास --- बाजीरावास दिले. इथे शाहूच्या एकूण कारकीर्दीचा पूर्वार्ध संपून उत्तरार्धास आरंभ होतो.

Posted by [ sanjay kshirsagar ]

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...