स्वातंत्र्य व क्षत्रियत्व जपावे हा संदेश आपल्या आचरणातून देणारे व
मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी व मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले त्या छत्रपति प्रतापसिंह महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ....
"राज्य जाईल अशी धमकी देता कशाला? मी कधीच राज्याची हांव धरलेली नाही. उघड चौकशीशिवाय केलेले आरोप मुकाट्याने मान्य करून राज्यावर राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. जे गुन्हे मी केलेच नाहीत, त्यांना उघड चौकशीशिवाय, केवळ तुम्ही सांगता म्हणून मी मान्यता देऊ? प्राणांतीही ते शक्य नाही, समजलात. मी कधी कोणाचे काही वांकडे केलेच नाही तर तुम्हांला किंवा प्रत्यक्ष काळालाही मी भिणार नाही. नुसत्या माझ्या कबुलीच्या सहीसाठी एवढ्या विनवण्या कशाला करता नि धाक तरी कशाला देता? छाती असेल तर करा ना उघड चौकशी. कटाचा एकेक मुद्दा तुमच्या पदरात घालून खऱ्या खोट्याचा निवाडा आत्ताच दाखवतो. हव्या त्या कबुलीजबाबावर सही करायला मी काही बाजीराव नव्हे ! तो बिचारा भेदरट भटजी होता, म्हणून त्याचे राज्य तुम्ही घेतले. त्याच्यासारखा मी तुमच्यापुढे डगमगणारा नव्हे बरे का नामदारसाहेब ! माझे चिमुकले राज्य! राहिले काय नि गेले काय ! माझी कशालाच काही हरकत नाही. पण लक्षात ठेवा, काही वाटते ते केलेत तरी असत्यापुढे या प्रतापसिंहाची मान रेसभरसुद्धा वाकणार नाही. फायद्याचा किंवा स्वार्थाचा लोभ धरून, मी आपले चारित्र्य कलंकित करून घेणारा नव्हे. तुमच्या या चिठोऱ्यावर मी सही करीत नाही जा. (गव्हर्नर सर जेम्स रिव्हेट कारन्याकला दिलेले उत्तर .)
No comments:
Post a Comment