विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 November 2023

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी 📜⚔ अग्निदिव्य भाग - 1

 


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी

📜⚔ अग्निदिव्य भाग - 1

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी अग्निदिव्य लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी< ोगल सलतनतीचे मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंह आणि दिलेरखान यांनी अतिशय नेटाने मोहीम चालवून स्वराज्याचा पार वानरविचका करून टाकला होता. शेतीभाती उजाड झाली. गावठाणे उठून गेली. दावणीची गुरे मोगली सुऱ्याखाली हलाल झाली. तरणीताठी पोरे गुलाम करून नेली गेली. शेकडो स्त्रिया भ्रष्ट झाल्या. दिलेरखानाची गडकोटांची मोहीम पुढे सरकत नव्हती कारण पुरंदराने अतिशय तिखट भांडण मांडले होते. अगदी प्रतिष्ठेचाच प्रश्न करून बसायचे ठरविले तर इरेला पडून शंभर वर्षे मोगली फौजांशी झुंज देण्याची रग प्रत्येक मराठ्याच्या काळजात आणि मनगटात होती. पण स्वराज्यात इतस्तत: फिरणाऱ्या मोगली वरवंट्याने अतोनात नासाडी मांडली होती. महाराजांना गडकोटांची अजिबात फिकीर नव्हती. पण रयतेची चिंता त्यांना अस्वस्थ करून सोडी. रयत वाचवायची असेल तर प्रतिष्ठा, मान-पान बाजूला ठेवणे गरजेचे होते. अंतिम ध्येयावर नजर ठेवून प्रसंगी दोन पावले मागे हटणे हाच तर होता गनिमी कावा. त्यात व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाला थारा नसतो. महाराजांनी प्रसंग ओळखून रयतेचा आणि स्वराज्याचा सर्वनाश टाळण्यासाठी पडते घ्यायचे ठरविले.
ात्र राजपूत मोठा हट्टी. आलमगिरावर असलेली त्याची निष्ठा अगदी शहजाद्याच्यासुद्धा चार अंगुळे वरचढ होती. त्याने तर संपूर्ण शरणागतीचाच हट्ट धरला. काही केल्या ऐकेचना. अखेर पुरंदर, कोंडाण्यासह तेवीस किल्ले आणि त्यांच्या अमलाखालील लाखो होनांच्या मुलखाचा घास घेतला तेव्हाच राजपूत शांत झाला; मिर्झाराजे आणि महाराजांमधील हा तह ‘पुरंदराचा तह’ म्हणून ख्यात झाला. महाराजांनी न लढताच अनेक किल्ले आणि मुलूख गमावला, पण स्वराज्य वाचविले. रयतेची बरबादी थांबविली. मिर्झाराजांचे दिल जिंकले. महाराजांचा उमदा स्वभाव, अदब, विनम्र-लाघवी वागणे-बोलणे, धर्मावरची त्यांची निष्ठा, स्वराज्याची तळमळ पाहून राजपूत त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करू लागला.मराठ्यांनी आजवर अशक्यप्राय वाटणारे विजयच मिळविले होते. पुरंदराचा हा असा अत्यंत अपमानास्पद तह करावा लागल्याने साऱ्या स्वराज्यात उदासी भरून राहिली होती. पण ती उदासी होती, मरगळ नव्हे. प्रत्येक किल्लेदार, ठाणेदार, सरदार, शिलेदार अतिशय सावध आणि सतर्क होता. तूर्तास लष्करी मोहिमा थंडावल्यामुळे दिवाणी कामांकडे लक्ष देण्यास महाराजांना आणि पंतमंडळाला उसंत मिळाली होती.महाराजांचा मुक्काम राजगडावर होता. फडावर बसून एकेका तुंबलेल्या प्रकरणाचा ते फडशा पाडीत होते. तेव्हा मिर्झाराजांचा जासूद खलिता घेऊन आल्याची वर्दी आली.ाडून दे त्याला. तसेच लगोलग मोरोपंत, दत्ताजीपंत, त्र्यंबक सोनदेव यांना पाठवून दे. नेताजी पागेकडे आहेत. त्यांना सांगा, टाकोटाक बोलावले आहे. हातोहात आईसाहेबांना वर्दी द्या, घटकाभरात आम्ही येत आहोत म्हणावे.क्षमा महाराज, पण केवळ मिर्झाराजांकडून माणूस आल्याचे कळाल्याबरोबर एवढी धावपळ? काही विशेष घडण्याची अटकळ आहे की काय?कुडतोजी, सरनोबतांच्या खालोखाल आमची भिस्त तुमच्यावर आणि तुम्हीच असे विचारावे? परवा नजरबाज बातमी घेऊन आला, तेव्हा तुम्ही समक्ष होतात ना?होय महाराज, आता आलं नीट ध्यानात. अहो, रिकामे बसून डोके पार गंजल्यागत झालेय बघा.कुडतोजी, हे असे डोक्याला गंज लागू देणे स्वराज्याला महाग पडू शकेल. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढचे बरेच महिने तलवार म्यान ठेवून चिंतेत जळत काढायचे आहेत. ‘अखंड सावधपण असावे ।’ हे समर्थांचे बोल कायम ध्यानात असू देत.तेवढ्यात मिर्झाराजांचा माणूस आणि मागोमाग पंतमंडळी फडावर दाखल झाली. जासुदाने मुजरा करून कंबरेची थैली समोर केली. महाराजांच्या इशाऱ्यासरशी फडावरच्या एका कारकुनाने पुढे होऊन ती ताब्यात घेतली आणि मोरोपंतांच्या स्वाधीन केली. जासूद म्हणाला–महाराजसाहेब, माझे मालिक मिर्झाराजाजींनी आपल्याला खास मुबारकबाद देण्यास मला फर्मावले आहे. तसेच आपणास अत्यंत तातडीने छावणीत दाखल होण्यास सांगितले आहे, असा तोंडी निरोप देण्याससुद्धा फर्मावले आहे.ीक आहे. तुझ्या धन्याला आमचे धन्यवाद कळव. आता भोजन आणि विश्रांती करून तिसरे प्रहरी आमचा जबाब घेण्यासाठी सदरेवर दाखल हो.लेकिन हुजूर, अबतक तो आपने खत पढाही नहीं.ते वाचल्याशिवाय कसे राहू? पण तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारी खुशी पत्रात केवळ खूशखबरच असल्याची ग्वाही देत आहे. अरे, याच्या भोजनाची आणि आरामाची चोख व्यवस्था करा.इनामाच्या आशेने जासूद थोडा वेळ घुटमळला, पण साऱ्यांचे निर्विकार चेहरे पाहून मुजरा करीत, पाठ न दाखविता फडातून बाहेर निघून गेला. तेवढ्यात नेताजी फडावर दाखल झाले.उघडा, मोरोपंत थैली! दिल्ली दरबारातून पुरंदराच्या तहाला मान्यता आल्याची बातमी आहे. शिवाय शाही फर्मान स्वीकारण्यासाठी बोलावणे आले आहे. वाचा.थैली उघडून मोरोपंतांनी खलित्यावर झरझर नजर फिरविली.महाराजांचा होरा अगदी अचूक आहे. येत्या गुरुवारी शाही फर्मान पोहोचणार आहे आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी ताबडतोब बोलावलेय रजपुतानं.अंदाज बांधण्याचा प्रश्नच नाही. छावणीतून स्वार रवाना होण्यापूर्वीच नजरबाजाने खबर पोहोचविली आहे. आज सोमवार, म्हणजे मिर्झाराजांच्या छावणीत उद्या सायंकाळपर्यंत दाखल व्हायलाच हवे. केवढे आमचे भाग्य थोर, दिल्लीचा बादशहा दस्तूरखुद्द आमच्या नावे शाही कृपेचे खास फर्मान पाठवितो आहे.महाराजांच्या स्वरातील विषाद आणि व्यथा लपून राहणारी नव्हती. नेताजी झटकन म्हणाले–<>महाराज, आपण बुद्धिबळाचे जाणकार. प्रसंगी दोन पावले मागे हटावे लागले, एखाद-दुसरे प्यादे गमवावे लागले तरी श्रेयस्कर. पण राजा वाचविणे महत्त्वाचे. माझ्या नजरबाजांनी खबरा आणल्यात, रजपुताच्या मनी मोठे राजकारण आहे. ते साधले तर स्वराज्याचा मोठाच फायदा आहे.महाराज, प्रसंग आला तेव्हा प्रत्यक्ष भगवंताला रण सोडून पळावे लागले. पण त्याची शरम न बाळगता स्वत:स रणछोडदास म्हणवून घेतात भगवंत. हे तैसेच समजायचे.ठीक आहे. आपण सारे आहात साथीला, मग चिंता ती कशाची? चला, ही बातमी आईसाहेबांच्या कानी घालू या. क्रमश:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...