सतत
स्वामीचे सेवेसी
श्रीमंत सकलगुणअलंकर्ण अखंडीत लक्षुमी अलंकृत राजमान्ये स्ने|| तान्हाजी धायभोर (धायबर) दंडवत वीनंती उपर येथील कुशल जाणुन स्वकीये कुशल लेखन आज्ञा केली पा| वीशेष काहाराकडे कुतरीयाचे पील २ आहेत ते पाठऊन देणे म्हणुन आज्ञा केली यैसीयांस स्वामीकडील पालखी घेऊन भोई आले होते त्याच बा|र (बरोबर) काला कुतरा गेला की आणीक कोन्ही कडे गेला हे न कले काला कुतरा बारंगल (वेडावलेला) जाला आहे हरणा कुतरा काळतोंडा महादजी बा|र पाठवीला आहे तो सेवेसी पावता होईल वीदीत जाले पा| काल्या कुतरीयाचे वर्तमान महादजी सांगत वीदीत होईल बहुत काये ली|| हे विज्ञापती
तान्हाजी धायभोर यांना बाजीरावांना पत्रांनी कुत्र्यांची माहिती दिली
शिक्रापूर तर्फ पाबल येथील मोकासदार सरदार
तान्हाजीराव धायबर यांचे मराठा साम्राज्याचे मुख्य प्रधान बाजीराव बल्लाळ पेशवे यांना पत्र ...
पत्राचे कारण की छत्रपती थोरले शाहू महाराज यांना कुत्र्याची उत्तम पिल्ले पाहिजे होती ती पिल्ले शिक्रापूर येथील तान्हाजी धायबर यांच्याकडे आहेत म्हणून त्यांची आज्ञा झाली त्यांचे खासगीतून कडे पाठविली देण्यासाठी सागितले.
सदर धायबर घराणे हे खेड तालुक्यातील कडुस या गावातील पाटीलकी वतनदारी होते.
हिंदवी स्वराज्याच्या धामधुमीच्या काळात म्हणजे सन १११० फसली ई.स.वी सन १७०० च्या काळात #कसबे_कडूस च्या #पाटीलकी मोकदमी सरदार धायबर यांच्याकडे होती...
मजकूर खालीलप्रमाणे ...
श्री.
असलं ब|| नकल
सिका पारसी
मजकूर आहे....
कसबे कडूस
सन १११०
मजकूर आहे...
........देशमुख व देशपांडे मजकूर...
...... कसबे मजकूर.....
जेऊ पा| बीन परस पा|
व माल पा| बीन येस पा|
व तान्हाजी पा| धायेभोर (धायबर)
मोकदम कसबे मजकूर (कडूस
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे एका पुस्तकात. ' चाकण चव्हर्यांशी चे कडू देशमुख आले, तलेग तळेगाव चे ढमढेरे आले!!, व पुढे ' शिक्रपुरचे धायबर आले!!असा उल्लेख केलेला आहे.
याचा अर्थ शिक्रापूर ही त्य धायबर घराण्या लष्करी मोकासा होते.सदर सदर शिक्रापूर गावात आजपण वाड्याचे जुने अवशेष दिसून येतात येत प्रमुख्याने, प्रवेशद्वार, तेथील सैनिक व भालधरांसाठी प्रवेशद्वारात चौकी आहे तसेच वाड्याचा उजव्या आणि डाव्या बाजूला दिसणारा जोता पूर्णपणे स्पष्ट दिसतो एक तीस फुटी उंच बुरुज असून जुने वाडे , जुना वाडा हा एकूण दोन वाडी येथे होते ज्यातील एका वाड्याचे पूर्ण अवशेष दिसून येतात तर दुसऱ्या वाड्या हा तीन एकर परिसरात असावा आणि एक काळा हा एक एकर परिसरात असावा असे सादर गावातील माहिती व अवशेषावरून दिसून येते शेजारीच विठ्ठल मंदिर असून हे चांगलं पुरातन बांधणीचं धाटणीचं मंदिर आहे .
सदर धायबर घराणे हे खेड तालुक्यातील कडुस या गावातील पाटीलकी वतनदारी होते.
हिंदवी स्वराज्याच्या धामधुमीच्या काळात म्हणजे सन १११० फसली ई.स.वी सन १७०० च्या काळात #कसबे_कडूस च्या #पाटीलकी मोकदमी सरदार धायबर यांच्याकडे होती...
मजकूर खालीलप्रमाणे ...
कसबे कडूस सरदार संताजीराव धायबर यांस इनाम होते
शिक्रापूर मोकास गाव होते... नंतर करंजे पाटील यांच्याकडून एक तक्षिमा पाटील की चार हजार रुपये विकत घेतली...
यावेळी शिक्रापूर अभ्यासदौर करताना मा श्री. अमोल धायबर, ( मोडी अभ्यासक व संशोधक)
मा. श्री. गणेश देशमुख, मा श्री. अभिजीत धायबर,मा श्री. अजिंक्य देशमुख , मा श्री.सागर देशमुख आदी उपस्थित होते
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे
No comments:
Post a Comment