विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 November 2023

गुत्तीचा किल्ला रवदुर्ग

 गुत्तीचा किल्ला रवदुर्ग




गुत्तीचा किल्ला रवदुर्ग म्हणूनही ओळखला जातो. आंध्र प्रदेशाच्या गूटी शहरातील टेकडीवर स्थित एक खंडित किल्ला आहे...
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात गुत्तीच्या लढ्याचा पराक्रमी मराठा सरदार “सेनापती मुरारराव घोरपडे”...🙏🚩
"एक झुंज शर्थीची" या पुस्तकातून :
किल्ला नंतर विजयनगर साम्राज्याच्या ताब्यात आला वेंकट द्वितीय (इ.स १५८४-१६१४) च्या कालखंडात विजयनगराने कुतुबशाही राजवंश जिंकला. कुतुबशाही राजधानी गोलकोंडावर विजय मिळवल्यानंतर मुगलांनी किल्ल्याचे नियंत्रण केले असे दिसते. इ.स.१७४६ च्या सुमारास मराठा सरदार मुरारराव घोरपडे यांनी किल्ला ताब्यात घेतला आणि आठ वर्षांनंतर ते कायमचे स्थायिक झाले त्याने किल्ल्याची दुरुस्ती केली आणि लहान प्रवेशद्वारांचे आरामाचे आभूषण केले. इ.स १७७५ साली मैसूर शासक हैदर अलीने किल्ल्यावर हल्ला करून हल्ला केला दोन महिन्यांनंतर मुररीराव यांना पाणी पुरवठा संपल्यानंतर ते आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले गेले किल्ला नंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला तिचे प्रशासक थॉमस मुन्नो यांना पायथ्याशी असलेल्या कबरीजवळ दफन करण्यात आले...
मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थानी गौरवास्पद ठरावी अशीच होती. म्हाळोजी घोरपडे आणि संताजींचे बंधू, सेनापती बहिर्जी घोरपडे हिंदूराव यांनी दक्षिण भारतात मर्दुमकी गाजवून गुत्ती-सोंडूर हा प्रदेश काबीज केला...
गुत्तीच्या लढ्याचा मराठा सरदार पराक्रमी सेनापती मुरारराव घोरपडे मित्र आणि शत्रू अशा दोघांनाही आदर वाटावा असे व्यक्तिमत्त्व मुरारीराव घोरपडे यांना लाभले होते. अठराव्या शतकात त्यांनी दक्षिणेकडील गुत्ती येथे राज्य केले त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा "एक झुंज शर्थीची" या पुस्तकातून वाचायला मिळते. त्यांचे चरित्र सांगणाराच हा ग्रंथ आहे. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशावर तसेच रायलसीमा जिल्ह्यावर मुरारीरावांची घट्ट पकड होती. मुत्सद्देगिरी आणि लढाऊ बाणा दाखवला...
सैन्याची गुणवत्ता आणि आत्मविश्वास ही त्यांची बलस्थाने होती. गुत्तीचा हा समृद्ध इतिहास नजरेसमोरून तरळत जातो कोप्पलचा किल्ला, गजेंद्रगड, गुत्तीचा किल्ला, शनिवारवाडा अशा अनेक रंगीत छायाचित्रामुळे घोरपडे यांच्या शर्थीचा इतिहास स्पष्टपणे उलगडत जातो...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...